sameer wankhede's father 
मुंबई

"माझा मुलगा चक्रव्यूह नक्कीच भेदणार"; समीर वानखेडेंच्या वडिलांना विश्वास

"समीरचा दोष एवढाच की त्याने नवाब मलिकांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक केली."

स्वाती वेमूल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक Nawab Malik यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede यांच्यावर सोमवारी आणखी काही आरोप केले. वानखेडे यांच्या जन्मदाखल्यावर वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचं दर्शवणारी दाखल्याची प्रतच मलिक यांनी सादर केली. समीर यांचे आई-वडील मुस्लीम होते. मग त्यांनी राखीव कोट्यातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळविला, असा सवालही मलिक यांनी केला. मात्र आपले वडील हिंदू, तर आई मुस्लीम होती, असं प्रत्युत्तर वानखेडे यांनी दिलं. या आरोपांवर वानखेडे यांच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "माझा मुलगा महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे शत्रूंच्या चक्रव्यूहात अडकला आहे. अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नव्हता, पण माझा मुलगा यातून मार्ग काढू शकेल याची मला खात्री आहे", असा विश्वास ज्ञानदेव वानखेडे यांनी व्यक्त केला.

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "तो (समीर) खूप अस्वस्थ आहे. माझं संपूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे. यामागे एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे- नवाब मलिक. समीरचा दोष एवढाच आहे की त्याने नवाब मलिकांच्या जावयाला (समीर खान) ड्रग्ज प्रकरणात अटक केली आणि त्याने (समीर खान) आठ महिने तुरुंगात काढले. मी एका हिंदू कुटुंबातून आलो आहे. एका मुस्लिम महिलेसोबत (समीर वानखेडे यांची आई) मी आंतर धर्मीय प्रेमविवाह केला होता. सहा वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला."

"नवाब मलिकांनी केलेले आरोप ऐकून मला खूप वाईट वाटलं. कोणी ज्ञानदेव हे नाव बदलून दाऊद असं म्हटलं तर तुम्हाला कसं वाटेल?", अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्ञानदेव वानखेडे यांनी पुढे सांगितलं की, "त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात ३५ वर्षे काम केलं आणि त्यांचा मुलगा १५ वर्षांपासून सरकारी कर्मचारी आहे. या संपूर्ण कारकिर्दीत माझ्यावर कोणताही आरोप झाला नव्हता आणि माझ्या मुलावरही कोणतेही आरोप करण्यात आले नव्हते."

७५ वर्षीय ज्ञानदेव वानखेडे यांनी तरुणांनाही सल्ला दिल्ला. "तुम्हाला जर समीर वानखेडेसारखं बनायचं असेल तर खूप धाडसी व्हावं लागेल. कारण तुमच्यावर हल्ला होऊ शकतो, तुम्हाला निलंबित केलं जाऊ शकतं, तुम्हाला अपमानाचा सामना करावा लागू शकतो, तुमच्या कुटुंबाला धमकावलं जाऊ शकतं," असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT