Strike against raosaheb danve sakal media
मुंबई

रायगड : दानवेंच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांनी गेल्या पंधरवड्यात एका चर्चासत्रात केलेल्या (controversial statement) वक्तव्यामुळे नाभिक समाजाच्या (Nabhik community) भावना दुखावल्या आहेत. त्याचे पडसाद सोमवारी अलिबागमध्ये मोर्चाच्या रूपाने उमटले. या वेळी कार्यकर्त्यांनी दानवे यांच्याविरोधात (strike) घोषणा देत त्यांचा निषेध केला.

रायगड जिल्हा नाभिक समाज संघाचे अध्यक्ष दिनेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली समाजाचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर एसटी स्टॅंड मार्ग बालाजी नाका, मारुती नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मार्गाने मोर्चा काढण्यात आला. रायगड जिल्हा नाभिक समाज संघाचे जिल्हा सहसचिव संतोष पवार, श्री संत सेना महाराज नाभिक समाज संस्थेचे अलिबाग तालुका अध्यक्ष वैभव मुकादम आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी नाभिक समाजाने रावसाहेब दानवे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. काही कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून मुंडण करण्यात आले. जालना येथे झालेल्या चर्चासत्रामध्ये नाभिक समाजाबाबत दानवे यांनी बेताल वक्तव्य केले, असा आरोप केला.

दानवे यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे, असा इशारा रायगड जिल्हा नाभिक समाज संघाने दिला. भविष्यात आंदोलनाची भूमिका तीव्र होणार आहे. त्यामध्ये रास्ता रोको, रेल्वे रोको असे आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असे यावेळी निवेदनाद्वारे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT