मुंबई विद्यापीठ sakal
मुंबई

ढोल, ताशांच्या गजरात नॅकचे मुंबई विद्यापीठात झाले स्वागत

व्यवस्थापन परिषदेने केली विकासाचे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विद्यापीठाला नॅक असा दर्जा मिळावा यासाठी आज नॅकच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या फोर्ट आणि कलीना संकुलाला भेट दिली. त्यावेळी एनएसएस आणि इतर विद्यार्थ्यांनी या नॅकच्या शिष्टमंडळाचे लेझीम, ढोल, ताशाच्या गजरात आणि मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत स्वागत केले. तर दुसरीकडे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठातील एकूण विकास कामे संशोधन आणि विद्यापीठातील असलेल्या सोयी सुविधा यांचे सादरीकरण केले. (Mumbai News)

मागील पाच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाला नॅक चा दर्जा नसल्याने येथील शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थी विकास कामावर मोठे परिणाम झाले आहेत त्याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाने नॅक दर्जा मिळावा, यासाठी विद्यापीठाने नॅक कडे अर्ज सादर केला होता या पार्श्‍वभूमीवर नॅकचे एक शिष्टमंडळ विद्यापीठात पोहोचले असून त्यांनी सुरुवातीला विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील विविध विभागाची पाहणी केली. तसेच विद्यार्थी, विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सिनेट सदस्य आणि त्यासोबतच विविध विभागांच्या प्राध्यापक आदीसोबत चर्चा केली.

सुरुवातीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. सुहास पेडणेकर यांनी व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात काही सादरीकरण करून विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या अनेक नामवंतांची माहिती दिली. त्यासोबतच विद्यापीठाने विविध उद्योजक, तज्ञ यांची विविध कमिट्यांवर वर्णी कशी लावली आहे याची माहिती शिष्टमंडळाला पुढे दिली.विविध कमिट्यांवर असलेल्या उद्योजक क्षेत्रातील व्यक्तीमुळे त्याचा विद्यापीठाच्या विविध विकास कामांवर कसा फायदा होत आहे याचीही माहिती यावेळी कुलगुरूंनी दिली. तर दुसरीकडे व्यवस्थापन परिषदेची सदस्य डॉ. वैभव नरवडे यांनी शिष्ठमंडळापुढे सादरीकरण करत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाची एकूणच तयारी आणि त्यासाठीचे टाकण्यात आलेले पाऊल याविषयीची माहिती सादर केली. विद्यापीठाने विविध संस्थांसोबत केलेले करार तसेच शैक्षणिक विकास आणि उद्योग, व्यवसायपूरक नवीन अभ्यासक्रम त्यामध्ये सागरी व्यवसाय शिक्षण, आभासी शिक्षण तसेच संशोधनात्मक प्रगती आदी.ची माहिती या सादरीकरणातून देण्यात आली.

मुंबई विद्यापीठाला जागतिक स्तरावर पुन्हा एकदा सन्मान मिळावा आणि त्यामुळे नॅकचा दर्जा मिळावा म्हणून विद्यापीठाने यासाठीची जोरदार तयारी केली आहे. फोर्ट व कलिना संकुलातील प्रत्येक विभाग रंगरंगोटी करून सजवण्यात आले आहेत. विद्यापीठात असलेले विविध दालने, गार्डन, इमारतीही अगदी स्वच्छ करण्यात आल्या आहेत. यासाठी कोणतीही कसर ठेवण्यात आली नाही. दरम्यान, नॅकच्या शिष्टमंडळाने विद्यापीठात असलेल्या 42 पैकी 11 विभागाची आज माहिती घेतली. पुढील दोन दिवस हे शिष्टमंडळ विद्यापीठाच्या विविध विभागांची माहिती घेऊन त्यासाठीची तपासणी करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT