Ramdas Athawale Sakal
मुंबई

Nagaland Vidhansabha Election Result : नागालँडमध्ये आरपीआयचा निळा झेंडा फडकला

नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन आठवले पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन आठवले पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

मुंबई - नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन आठवले पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. टूएनसंद सदर- 2 विधानसभा मतदारसंघात इम्तिचोबा तर नोकसेन विधानसभा मतदारसंघात पक्षाचे अधिकृत उमेदवार वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत.

नागालँड मध्ये गन्ना किसान ( ऊस शेतकरी) या चिन्हावर पक्षाच्या उमेदवारांनी 8 ठिकाणी  निवडणूक लढली आणि त्यात 2 उमेदवार विजयी झाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रिपाइंच्या मध्यवर्ती कार्यालयात फटाके वाजवून नाचून आनंद साजरा केला. रामदास आठवले यांनी ढोल वाजवून विजयाचा जल्लोष साजरा केला.

नागालँड मध्ये निवडून आलेले रिपाइं चे दोन्ही आमदार नागालँड मध्ये भाजप एनडीपीपीच्या युतीला सरकार स्थापने साठी पाठिंबा देतील. नागालँड सरकार मध्ये रिपाइं ला सत्तेचा वाटा मिळण्यासाठी आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पक्ष श्रेष्टी नेत्यांना भेटणार आहे असे रामदास आठवले यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे, स्थानिक जिल्हा अध्यक्ष संजय पवार, दयाळ बहादूर, सचिनभाई मोहिते, साधू कटके, प्रकाश जाधव, घनश्याम चिरणकर, अमित तांबे, शिरीष चिखलकर, अली चौधरी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT