मुंबई

नायर रुग्णालयात दरवर्षी साचते पाणी, यंदाच्या पावसात दोन वेळा

भाग्यश्री भुवड

मुंबईः  मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात पावसाचे पाणी साचले. या साचलेल्या पाण्यातून कोविड योद्धांनी आपली रुग्ण सेवा बजावली. मात्र, या पाण्याचा निचरा करणारे पालिकेचे अधिकारीही यावेळी हतबल झाले. कारण, गेल्या अनेक वर्षांपासून या संपूर्ण परिसरात पाणी साचू नये म्हणून पालिकेचे अधिकारी प्रयत्न करत असून त्यांना अद्याप यश आलेले नाही. 

नायर रुग्णालयाची एसडब्लूडी लाईन ही दोन किलोमीटर अंतरापर्यंत हाजीअलीला जाते आणि याच दरम्यान जर हायटाईड झालं किंवा 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडला तर पंपिंग स्टेशनचे दरवाजे बंद केले जातात. दरवाजे बंद केल्यावर जी दोन किलोमीटरची लाईन आहे ती पूर्णपणे भरते. त्यामुळे पाणी पुढे जाण्या ऐवजी पुन्हा मागे येते ज्या कारणामुळे संपूर्ण परिसरात पाणी साचायला सुरूवात होते. 

अशा वेळेस ड्रेनेज आणि मॅनहोल खुले केले जातात. आतापर्यंत 6 मॅनहोल्स आणि 11 ड्रेनेज खुले केले आहेत. मात्र आता हे ही बंद करुन टाकले आहेत. कारण, पाणी खाली जाण्याऐवजी ते पुन्हा वर येत आहे. पाणी वाढण्यापेक्षा ते थांबवण्यासाठी असा निर्णय घेतला जातो अशी माहिती इ वॉर्ड विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी सांगितले आहे. शिवाय या परिसरातून आता कोणतीही नवीन लाईन काढता येणार नसल्याचे ही दगडखैर यांनी सांगितले.

दरवर्षी अशा प्रकारे या परिसरात पाणी साचते. सर्व प्रकारचे प्रयत्न करुनही पाण्याचा निचरा होत नाही. हायटाईड जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत हे पाणी कमी होणार नाही. 

मकरंद दगडखैर, सहाय्यक आयुक्त, इ वॉर्ड विभाग

ही दुसरी वेळ आहे ज्यामध्ये एवढं पाणी साचलं. माझं तिसरं वर्ष आहे इथे हॉस्टेलमध्ये ही दुसरी वेळ आहे. जिथे मी एवढं पाणी साचलेलं बघतो आहे. गेल्यावेळी पंप पूर्ण काम करत नव्हते म्हणून पाणी साचलं होतं. पण यावेळी खूप जास्त पाणी साचलं. फक्त नायर नाही तर पूर्ण आजूबाजूच्या भागात पाणी साचलं. समोरच्या बिल्डिंगमध्ये गाड्या ही पूर्ण पाण्याखाली गेल्या. पूर्ण बॅकफ्लो आला आहे. जिथून मेट्रोचा काम सुरु आहे. तिथून सातरस्तापर्यंत पूर्ण पाणी साचलं. ड्रॅनेजचं काम नीट झालं नाही. त्यामुळेच हे पाणी साचलं. कारण पूर्ण यंत्रणा कोरोनामध्ये व्यस्त आहे. ओपीडी आणि जी बिल्डिंगमध्ये गुढघ्यापर्यंत पाणी साचलं आणि आम्ही ऍम्ब्युलन्स मधून मुलांना हॉस्टेलमधून स्थलांतरीत केलं, असं नायरच्या एका निवासी डॉक्टरनं सांगितलं आहे.

---------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Nair Hospital Waterlogging issue every year twice in this year rain

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT