Nalasopara Crime Sakal Digital
मुंबई

रोता क्यू है, म्हणत नालासोपाऱ्यात माथेफिरूंची पादचाऱ्याला मारहाण, Video व्हायरल

नालासोपाऱ्यात किरकोळ कारणावरून चार जनात तुंबळ हाणामारी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा: नालासोपाऱ्यात किरकोळ कारणावरून चार जणात तुंबळ हाणामारी झाली आहे. रस्त्यावरून जाताना दोन माथेफिरूंनी शिवीगाळ करत विनाकारण एका वाटसरूला दगड, लाथा बुक्याने मारहाण करत गंभीर जखमी केली आहे. सुजित सिंग (वय 43) असे जखमी झालेल्या वाटसरुचे नाव असून तो जिओ टॉवर मध्ये काम करतो. नालासोपारा पश्चिमेच्या गुलमोहर अपार्टमेंट समोर रविवारी रात्री 7:30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून दोघेही फरार आहेत.

याच घटनेचा एक व्हिडिओ सोमवारी सकाळी समोर आला असून, व्हिडीओमधील हाणामारी किती तीव्र होती हे दिसत आहे. मारहाण करणारा एक जण चक्क बॅगेतील हातोडा घेऊन मारण्याच्या तयारीत होता पण घटनास्थळावरील काही तरुणांनी त्या माथेफिरूला तत्काळ अडविल्याने मोठा अनर्थ टळला आहे.घटनेची माहिती नालासोपारा पोलिसांना कळताच, पोलिसानी त्वरित घटना स्थळी दाखल होऊन हा वाद मिटवून दोन जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शशांक मुल्कराज (वय 26), दीपक शितप्रसात पांड्या वय (27) असे मारहाण करणाऱ्या माथेफिरूची नाव आहेत. त्याच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात कलम 324,323,504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हे दोघेही फरार असून पोलीस यांचा शोध घेत असल्याची माहिती नालासोपाराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT