Crime Sakal
मुंबई

Nalasopara Murder: खळबळजनक! नालासोपारात 'दृश्यम' सारखी घटना; पतीचा मृतदेह घरातच पुरला अन् वरून फरशीही बसवली, मात्र...

Nalasopara Murder Case, Drishyam Style Crime : जाणून घ्या, पत्नीच्या या भयानक कृत्याचा भांडाफोड कसा झाला?

Mayur Ratnaparkhe

Shocking Crime in Nalasopara: नालासोपारा येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची निर्घृण हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरातच पुरला. ही धक्कादायक घटना नालासोपारा पूर्वेतील गंगादीपाडा परिसरातील साई वेल्फेअर सोसायटीच्या चाळीत घडली. हत्येनंतर महिलेने तिच्या मेहुण्याला त्या ठिकाणी टाइल्स लावायला लावले आणि मृतदेह लपवून ठेवला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव विजय चौहान आहे. हत्येचा आरोप असलेल्या महिलेचे नाव गुडिया चमन चौहान आहे आणि तिच्या प्रियकराचे नाव मोनू विश्वकर्मा आहे. या जोडप्याला ८ वर्षांचा मुलगा देखील आहे.

मृत विजयची पत्नी गुडियाचे मोनूशी प्रेमसंबंध होते असे सांगितले जात आहे. तर विजय त्यांच्या नात्यात अडथळा बनत होता, म्हणून दोघांनी मिळून एक कट रचला आणि विजयची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह घरात पुरला. हत्येनंतर, मृतदेह लपवण्यासाठी, महिलेने तिच्या मेहुण्याला त्या ठिकाणी फरशी लावाली, जेणेकरून तो मृतदेह कोणाच्याही नजरेत येऊ नये.

त्याच वेळी, या घटनेनंतर, जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी विजयबद्दल विचारले तेव्हा, गुडियाने त्यांना तिच्या पतीबद्दल सतत दिशाभूल केली. काही दिवसांनी, जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी विजयच्या घराचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर, जेव्हा त्यांनी जमीन खोदली तेव्हा विजयचा मृतदेह सापडला. ही घटना सुमारे १५ दिवसांपूर्वी घडली होती, परंतु दोन दिवसांपूर्वी, महिलेच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद संदेश मिळाल्याने पोलिसांना संशय आला. चौकशीदरम्यान, ही घृणास्पद हत्या उघडकीस आली.

 पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सध्या, आरोपी महिला आणि तिचा प्रियकर फरार आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली आहेत आणि लवकरच त्यांना अटक करण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकारणाचे दोन ‘बॉस’, एकाच दिवशी बर्थडे... कोण भारी? फडणवीसांचा ‘मी पुन्हा येईन’ Vs अजितदादांचा पहाटेचा गेम!

Latest Maharashtra News Updates : गेम खेळणं भोवणार? कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा, आता पुढील उपराष्ट्रपती कोण? महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्याचे नाव आघाडीवर

Solapur Accident:'कार आणि एसटीच्या धडकेत आटपाडीचे दोघे ठार; वाटंबरे येथे दुर्घटना, चालकांचे नियंत्रण सुटलं अन्..

Nandani Math Elephant : महाराष्ट्र, कर्नाटकातील जैन समाजाच्या ७४८ गावात प्रिय असणारा नांदणी मठाचा हत्ती जाणार अंबानींच्या जंगलात, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT