The name plate of Uddhav Balasaheb Thackeray as the Chief Minister outside his cabin
The name plate of Uddhav Balasaheb Thackeray as the Chief Minister outside his cabin 
मुंबई

मंत्रालयात झळकली 'मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे' पाटी

वृत्तसंस्था

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (ता. 28) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज दुपारी 1 वाजता ते मुख्यमंत्रीपदाची सर्व सूत्रे स्विकारतील. यापूर्वी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या सचिवालय सजविण्यात आले आहे. तर सचिवालयाबाहेर त्यांच्या नावाची पाटीही झळकली आहे.

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्विकारण्याचा आज पहिला दिवस असल्याने मंत्रालयात उत्साह आहे. सचिवालयाबाहेर 'उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री' अशा नावाची पाटीही झळकली आहे. सचिवालयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजविण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून पहिला दिवस कसा जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

काल 'मी उद्घव बाळासाहेब ठाकरे, ईश्‍वरसाक्ष शपथ घेतो की...' हा आवाज शिवाजी पार्कवर घुमताच उपस्थित हजारो शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला होता. राज्यभरातील शिवसैनिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आज वीस वर्षांनंतर प्रत्यक्षात आला. आकाशातील सूर्य मावळतीला जात असताना शिवसेनेचा सत्तासूर्य उगवला. राज्य आणि देशभरातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रिपदी विराजमान झाली आहे. उद्धव यांच्यासह अन्य सहा नेत्यांचा शपथविधीही या वेळी पार पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT