मुंबई

पटोले फोन टॅपिंग प्रकरणी आक्रमक; रश्मी शुक्लांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी रश्मी शुक्ला च्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी नागपूर दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने नाना पटोले यांच्याबाबत माहिती गोळा केली असल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले आणि त्यांची ओळख बदलवून त्यांना गंभीर गुन्हेगाराची ओळख दिली, असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

नाना पटोले यांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न रश्मी शुक्ला यांनी केला. त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा विश्वास मोडण्याचा प्रयत्न रश्मी शुक्ला यांनी केला. या सर्व प्रकारात रश्मी शुक्ला यांनी अब्रु नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) पुणे कमिशनर असताना माझा नंबर टॅपिंग केला. माझी बदनामी करण्याचे काम केलं. याप्रकरणात माझी व्यक्तिगत बदनामी झाली असल्यानं रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर 500 कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे त्यांनी खडसावून सांगितले आहे.

यावेळी ते म्हणाले होते की, डीजी आणि नागपूर सीपी, रश्मी शुक्लांसह फोन टॅपिंग प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. पुढे ते म्हणाले, येणाऱ्या काळात कुणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार असून सूत्रधारांचा पर्दाफाश मविआ केल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT