Loksabha Election sakal
मुंबई

Loksabha Election : आदर्श निवडणुकांत नंदुरबार पहिल्या स्थानी ; निवडणूक स्वास्थ्य निर्देशांक जाहीर ,पुणे व मुंबई क्रमवारीत तळाला

मतदानाची टक्केवारी, महिलांचा सहभाग, उमेदवारांचे चारित्र्य आणि निकोप निवडणुकांबाबतीत राज्यातील आदर्श लोकसभा मतदारसंघ कोणता? असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या मनात कदाचित एखाद्या शहरी मतदारसंघाचे नाव येईल; पण तसे मुळातच नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मतदानाची टक्केवारी, महिलांचा सहभाग, उमेदवारांचे चारित्र्य आणि निकोप निवडणुकांबाबतीत राज्यातील आदर्श लोकसभा मतदारसंघ कोणता? असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या मनात कदाचित एखाद्या शहरी मतदारसंघाचे नाव येईल; पण तसे मुळातच नाही. राज्यातील निवडणूक स्वास्थ्य निर्देशांकात (ईएचआय) नंदूरबार पहिल्या स्थानावर आहे.

त्या खालोखाल गडचिरोली-चिमूर आणि हातकणंगले मतदारसंघ अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. पुणे, मुंबईकडील मतदारसंघ क्रमवारीत तळाला आहेत. फ्लेम युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर नॉलेज अल्टरनेटिव्ह यांनी राज्याचा निवडणूक स्वास्थ्य निर्देशांक घोषित केला. २००९ ते २०१९ कालावधीत झालेल्या सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघाच्या विदाच्या (डेटा) विश्लेषणाच्या आधारे ही क्रमवारी घोषित केली आहे.

फ्लेम विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात हे निर्देशांक जाहीर केले. यावेळी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, इंडियन एक्स्प्रेसचे डेप्युटी एडिटर अमिताभ सिन्हा, पीआरएस लेजिस्लेटीव्ह रिसर्चचे सहसंस्थापक डॉ. एम. आर. माधवन, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते. प्रा. डॉ. युगांक गोयल, तान्या चंद्रा आणि वृंदा एम. यांनी अहवाल प्रसिद्ध केला. शहरीपेक्षा ग्रामीण भागातील निवडणूक स्वास्थ्य तुलनेने चांगले असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

महत्त्वपूर्ण निष्कर्ष

(सन २००९ ते १९)

  • महाराष्ट्रातील सरासरी मतदान टक्केवारी ५१ वरून ६१ टक्क्यांपर्यंत वाढली

  • महिलांचे मतदान ४७ वरून ५९ टक्क्यांवर

  • अपक्ष उमेदवारांच्या मतांतील वाटा घसरला असला; तरी अपक्ष निवडून येण्याचे प्रमाण फार बदलेले नाही

  • २००९मध्ये गंभीर गुन्हे असलेल्या उमेदवारांचे प्रमाण ११ टक्के; २०१९ मध्ये १८ टक्के झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT