मुंबई

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवुडमधील ड्रग्ज वितरणाप्रकरणी NCB ची जोरदार कारवाई

अनिश पाटील

मुंबई : एकीकडे सर्व मुंबईकर नवर्षाचे स्वागत करीत असतानाच दुसरीकडे नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवुडमधील ड्रग्ज वितरणाप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) दोन मोठ्या कारवाया केल्या. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मुंबईतील मोठ्या ड्रग्स तस्कराची माहिती एनसीबीला मिळाली आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंधेरी आणि कुर्ला या मुंबईतल्या दोन ठिकाणी एनसीबीने छापा टाकून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज हस्तगत केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एकूण तीन ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

तर दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने देखील नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई केली आहे. बांद्रा युनिटने 52 लाख रुपये किंमतीचे 204 ग्रॅम कोकेन ड्रग्ज जप्त केले असून एका नायजेरियन आरोपीला अटक केली आहे. कारमध्ये ड्रग्ज घेऊन आला होता हा आरोपी वाकोला सांताक्रुज पूर्व मध्ये पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याला अटक केली.

तर दुसरीकडे काही ड्रग्ज तस्कर मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करण्यासाठी अंधेरी आणि कुर्ला परिसरात येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.  त्यानुसार, NCB ने दोन पथके तयार करीत, या ठिकाणी छापेमार करून तिघाना अटक केल्याचे एनसीबीने सांगितले. 

( संपादन - सुमित बागुल )

narcotics control bureau conducted two big raids in connection with Bollywood case

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खलिस्तानी पन्नूची दिलजीत दोसांजला धमकी; बिग बींच 'या' वादाशी काय आहे कनेक्शन?

सात महिन्यांनी आला, ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला अन् रोहित शर्मा जगात भारी ठरला... ICC ची मोठी घोषणा, शुभमन गिलला केलं रिप्लेस

IIT Admission Without JEE: आनंदाची बातमी! आता जेईईशिवाय प्रवेश मिळणार 'या' IIT मध्ये, जाणून घ्या कसे

CM Devendra Fadnavis: आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींसारखी पप्पूगिरी करू नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी

Whatsapp बनले कलरफूल! नव्या फीचरने जिंकली लाखो मने..तुम्हीही वापरा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT