Narendra Dabholkar 
मुंबई

दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपी विक्रम भावेला जामीन मंजूर

मुख्य आरोपींना घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी केली होती मदत

- सुनीता महामुणकर

मुख्य आरोपींना घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी केली होती मदत

मुंबई: विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात (Narendra Dabholkar Murder Case) आरोपी असलेल्या विक्रम भावेला (Vikram Bhave) आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सशर्त जामीन मंजूर केला. दाभोलकर यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना मदत केल्याचा आरोप भावेवर आहे. पुण्यामध्ये दाभोलकर यांची हत्या सकाळच्या वेळी दोन जणांनी पिस्तूलातून गोळ्या झाडून केली. CBI ने या आरोपात आरोपी सचिन अंडुरे (Sachin Andure) आणि शरद कळसकर (Sharad Kalaskar) यांच्यावर गुन्हा दाखल केला. या दोघांना घटनास्थळी रेकी करण्यासाठी आणि गुन्हा केल्यानंतर तिथून फरार होण्यासाठी भावेने मदत केली, असा आरोप त्याच्यावर पोलिसांनी ठेवला आहे. त्याला आज सशर्त जामीन (Conditional Bail) मंजूर केला. (Narendra Dabholkar Murder Case Culprit Vikram Bhave granted Conditional Bail)

न्या. एस एस शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे जामीन याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने त्याला एक लाख रुपयांचा व्यक्तिगत जामीन मंजूर केला. तसेच पुढील एक महिना रोज संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, त्यानंतर दोन महिने एक दिवसाआड हजेरी लावावी, असे आदेश खंडपीठाने दिले. खटल्याला हजेरी लावावी, साक्षी पुरावे प्रभावित करु नये आणि कोणतेही गैरकृत्य करु नये, असे आदेश दिले. सीबीआयच्या वतीने अ‍ॅड. संदेश पाटील यांनी या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र खंडपीठाने ही मागणी अमान्य केली.

दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 ला झाली. आरोपी कळसकरने सीबीआयला दिलेल्या जबाबानंतर अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि भावेला मे 2019 मध्ये अटक करण्यात आली. पुनाळेकरला पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला, पण भावेचा जामीन न्यायालयाने नामंजूर केला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी याचिका केली. भावे पुनाळेकरकडे सहाय्यक म्हणून काम करत होता. सीबीआयच्या आरोपानुसार, दाभोलकर हत्येमध्ये वापरलेली हत्यारे नष्ट करण्याची सूचना पुनाळेकरने कळसकरला केली होती तर कळसकर आणि अंदुरेला घटनास्थळी रेकी करायला आणि गुन्हा केल्यानंतर पळून जाण्याला भावेने मदत केली होती.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT