मुंबई

शिलवीने वैभवला बोलावलंच का ? नरेंद्रला मात्र हे अजिबात मान्य नव्हतं..

सकाळ वृत्तसेवा

कळवा : जावयाला आपल्या घरी बोलावले याचा राग मनात धरून, रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला मारहाण करत हत्या केल्याची घटना दिव्यात घडली. 

दिवा येथे राहणारे नरेंद्र नारायण चिल्कामारी (36) यांचे अनुष्का (40) हिच्याबरोबर दुसरे लग्न झाले होते. अनुष्काचं देखील पाहिलं लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून अनुष्काला शिलवी नावाची 22 वर्षांची मुलगी आहे. शिलवी हिने दिवा येथील वैभव जाधव याच्याबरोबर प्रेमविवाह केला होता. शिलवी बंगळूर येथील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. हे नरेंद्रला मान्य नव्हते. त्यातून जावई वैभव आणि नरेंद्र यांच्यात वाद सुरू होता. या वादातून काही दिवसांपूर्वी जावई वैभव याने नरेंद्र यांच्या घराची तोडफोड केली होती. 

महत्त्वाची बातमी :  मुंबईकरांसाठीची 'ती' गोड बातमी अखेर आली...

हा वाद मिटवण्यासाठी त्याने अनुष्काबरोबर तिच्या दिवा येथील घरी बैठक घेतली होती. मात्र वैभवने आपल्या घरी येणे नरेंद्रला मान्य नव्हते. वैभव घरी आल्याचे नरेंद्रला मोबाईलवरून समजले होते. याचा जाब मंगळवारी नरेंद्रने अनुष्काला विचारला होता. 

दरम्यान, अनुष्का आणि नरेंद्र या दोघांनाही दारूचे व्यसन होते. या दारूच्या नशेत दोघांचे वैभव घरी येण्यावरून भांडण झाले. या वादात नरेंद्रने अनुष्काला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करून तिची हत्या केली, अशी माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक (गुन्हे) आर. बी. वळतकर यांनी दिली. या संदर्भात मुंब्रा पोलिसांनी अनुष्काचा पती आरोपी नरेंद्र चिल्कामारी (33) याला मंगळवारी रात्री अटक केली. या संदर्भात मुंब्रा पोलिस अधिक तपास करीत आहेत.  

WebTitle : narendra killed anushka for calling son in law in kalwa 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : अजित पवारांच्या ताफ्यासमोर तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, बीडमधील प्रकार

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT