Mumbai Metro esakal
मुंबई

Narendra Modi Mumbai Visit : न केलेल्या कामाच्या गमजा मारू नका; भाजप नेत्याचे सेनेला उत्तर

मुंबईतील मेट्रो 7 आणि मेट्रो 2अ चं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रकल्पांचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप शिवसेनेतर्फे केला जातोय. त्यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सडोतोड उत्तर दिले आहे. (Narendra Modi Mumbai Visit bjp keshav upadhyay Shivsena politics Mumbai Metro )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे. मोदी यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. दरम्यान यावरुन शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, केशव उपाध्ये यांनी सेनेच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.

शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

काय म्हणाले उपाध्ये?

कुठलं काम शिवसेनेनं केलं. उलट ज्या मेट्रोची सुरुवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्याला विलंब करण्याच काम उद्धव ठाकरेंनी केलं. चांगले रस्त्ये शिवसेनेला मुंबईकरांना देता आले नाहीत. आत्ता चांगल्या रस्त्यांना सुरुवात होत आहे. त्यातही शिवसेनेला अस्वस्था वाटत आहे. जळजळ दिसत आहे.

त्यामुळे उगाचाच न केलेल्या कामांवर गमजा मारु नका. लोकांची दिशाभूल करु नका. लोकांना माहिती आहे काम कोणी केलं आहे. आणि ज्या कामाची देवेंद्र फडणवीसांनी सुरुवात केली त्याचेच उद्घाटन नरेंद्र मोदी करणार आहेत.

सेनेचे आरोप

मुंबईतील पहिल्या मेट्रोपासून सुरू झालेलं श्रेयवादाचं राजकारण आता दहिसर मेट्रोपर्यंतही सुरूच असल्याचं दिसून येतंय. मुंबईतील मेट्रो 7 आणि मेट्रो 2अ चं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. या दोन्ही प्रकल्पाच्या श्रेयवादावरुन लढाई सुरु झालेली आहे. ट

पहिल्या फेजचं उद्घाटन गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं होतं. अशात सरकार बदलताच शिंदे-फडणवीस सरकारनं या प्रकल्पाच्या दुसऱ्या फेजचे उद्घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्याचं ठरवलं. आम्हीच सुरु केलेले प्रकल्पं पुढे नेले जात असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT