naresh mhaske aditya thackeray sakal
मुंबई

Thane News : वरळी सोडून शिवडीचा पर्याय का शोधता; नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना सवाल

तुमच्या हिम्मत असेल तर वरळीत लढा. वरळी सोडून शिवडी हा पर्याय का शोधता असा सवाल शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना केला.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - तुमच्या हिम्मत असेल तर वरळीत लढा. वरळी सोडून शिवडी हा पर्याय का शोधता असा सवाल शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना केला. रविवारी ठाण्यातील जाहीर सभेत आदित्य ठाकरे यांनी पुनरुचार काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच मतदारसंघात लढण्याचे जाहीर आव्हान दिले. त्यावर त्यांनी हा सवाल उपस्थित केला. तर, आदित्य ठाकरे हे बालिश असल्याचाही उल्लेख म्हस्के यांनी यावेळी केला.

ठाण्यात शिवसेनेची ताकद ही एकनाथ शिंदे कडे आहे की खासदार राजन विचारे किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे ते पाहावे. मग समजेल ताकद कुणाची आहे. तसेच लोक कोणाकडे आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हेही समजून येईल असेही म्हस्के यांनी यावेळी स्पष्ट करत आपला निशाणा साधला. आदित्य ठाकरे हे कुठे येऊन आणि किती तर लोकांसमोर आव्हान करतात.

ठाणे तर लांबच आहे, कल्याणमध्ये लढा आमच्या विरोधात सर्वांनी लढा. तुमच्यासोबत किती लोक आहेत,ते चारही सभा घेतल्या त्या सभा दिसले. त्या सभा म्हणजे नुक्कड सभा असल्याचीच टीका यावेळी म्हस्के यांनी केली. त्यामुळे त्या सभा तपासा समोरची मंडळी चारही ठिकाणी तीच मंडळी दिसत आहे. आम्ही शिवसेनेत असताना ज्या जोषात आणि उत्साहात मिटिंग आणि आपल्या जाहीर सभा करायचो ते चित्र आणि आताचे चित्र पहावे, असे आवाहनही केले.

ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावे चर्चेत नाही - म्हस्के यांचे स्पष्टीकरण

​मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच महायुतीच्या तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यातून तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची नावे पुढे येत असताना, शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावे चर्चेत नसल्याचे स्पष्टीकरण देत, या मतदारसंघात वरिष्ठ जो उमेदवार देतील, त्याचे काम करणारा असून पक्षीय भेदभाव आम्ही बाजूला ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT