मुंबई

ठाण्याच्या महापौरपदी नरेश म्हस्के बिनविरोध 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शिवसेनेचे सभागृहनेते नरेश म्हस्के यांची आज ठाण्याच्या महापौरपदी, तर पल्लवी कदम यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार दिला नसल्याने कोल्हापूरनंतर ठाण्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होऊन शिवसेनेचा महापौर आणि उपमहापौर बिनविरोध निवडून आले आहेत.

नरेश म्हस्के यांना महापौरपदाच्या खुर्चीवर बसविण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपस्थित होते. गेल्या महिनाभरापासून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी यांचे सरकार येणार असल्याची चर्चा आहे. पुढील दोन दिवसांत त्या दृष्टीने प्रयत्न होऊन सरकार स्थापनेचा दावाही केला जाणार असल्याचे कळते. पण अशाप्रकारची आघाडी यापूर्वीच कोल्हापूर येथे राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आताही राज्यस्तरावर अशी चर्चा सुरू झाल्यानंतर ठाण्यातही हा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. ठाण्यात शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ आहे. मात्र, या वेळी त्यांच्याकडून उमेदवार उभा केला जाऊ नये यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दालनात जाऊन तेथील नगरसेवकांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांचा उमेदवार या निवडणुकीत उभा केला नाही; तर पुरेसे संख्याबळ नसल्याने भाजपनेदेखील महापौरपदासाठी उमेदवार उभा केला नाही. आज नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड होताना शिवसेनेच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

उद्धव ठाकरे या वेळी उपस्थित राहणार असल्याने महापालिकेचा सर्व परिसर भगव्या झेंड्यांनी सजविण्यात आला होता. महापालिका मुख्यालयात फुलांची आरास करण्यात आली होती. त्याचबरोबर सिंहासनावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आजच्या महापालिका मुख्यालयातील व्यासपीठावर बसविण्यात आला होता. त्याचबरोबर म्हस्के यांची निवड झाल्यानंतर फटाक्‍यांची आतिषबाजी करण्यात आली व खास मिरवणूक काढून शिवसेनेचे दिवगंत नेते आनंद दिघे यांच्या समाधीचे म्हस्के यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. 

महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी महापौरांची निवड जाहीर करण्यात आली. महापौरपदासाठी शिवसेनेचे नरेश म्हस्के यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट होते. पण उद्धव ठाकरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
 

web title : Naresh Mhaske unopposed as mayor of Thane

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT