national-park 
मुंबई

नॅशनल पार्कमध्ये पाच महिन्यांमध्ये ५ प्राण्यांचा मृत्यू !

मिलिंद तांबे

मुंबई : गेल्या पाच महिन्यांमध्ये (last five months) राष्ट्रीय उद्यानाच्या (national park) पिंजराबंद अधिवासातील पाच प्राण्यांचे अचानक मृत्यू (five animal death) झाले आहेत. त्यामुळे उद्यानातील पिंजराबंद अधिवासातील प्राण्यांची काळजी (animal care) घेणाऱ्या उद्यान प्रश्नावर कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्राण्यांची नियमित तपासणी करण्यासाठी पूर्णवेळ निवासी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची (animal doctors) आवश्यकता आहे. (national park-five animal death-last five months-animal care-animal doctors-nss91)

राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारी ही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, गेल्या आठवड्यात या सफारीतील प्रसिद्ध वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सफारीमधील वाघांची संख्या वाढवण्याबरोबर प्रजननासाठी जुलै, 2016 मध्ये याठिकाणी पेंच राष्ट्रीय उद्यानातून दोन वाघिणी आणण्यात आल्या होत्या. त्यामधील साधारण 13 वर्षांच्या 'मस्तानी' वाघिणीचे गेल्या आठवड्यामध्ये गुरुवारी आकस्मिक निधन झाले. उद्यानातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.14) 'मस्तानी'ने काही न खाल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर तिला 106 डिग्री ताप असल्याचे निषन्न झाले. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. गुरुवारी (ता.15) रोजी संध्याकाळी ती अस्ताव्यस्त झाली आणि तिचा मृत्यू झाला.

'मस्तानी'च्या शवविच्छेदनात तिच्या गर्भाशयामध्ये गाठी तयार झाल्याचे दिसून आले. शिवाय तिच्या गळ्यामध्ये मांसाचा तुकडाही अडकल्याचे शवविच्छेदन तपासणीवेळी दिसून आले. मस्तानीबरोबरच व्याघ्र सफारीतील सर्वात जुन्या 'बसंती' वाघिणीचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 'बसंती'चा मृत्यू हा वृद्धापकाळाने झाल्याचे माहिती मिळाली आहे. 'बसंती' आणि 'मस्तानी'च्या आकस्मिक मृत्यूमुळे आता राष्ट्रीय उद्यानात पाच वाघांचा अधिवास राहिला आहे. आता उद्यानात 'मस्तानी'सोबत पेंच मधून आणलेल्या 'बिजली' वाघिणीसह नागपूरहून आणलेली 'दुर्गा' आणि बसंतीची मुलगी 'लक्ष्मी' वाघिणीचा समावेश आहे. तर नरांमध्ये 'बाजीराव' आणि 'सुलतान' हे दोन नर आहेत.

पाच प्राण्यांचा मृत्यू

राष्ट्रीय उद्यानाच्या पिंजराबंद अधिवासातील पाच प्राण्यांचा गेल्या पाच महिन्यात आकस्मिक मृत्यू झाला आहे. यामध्ये बिबट्या निवारा केंद्रातील दोन बिबटे, सिंह सफारातील एक मादी सिंह आणि व्याघ्र सफारीतील दोन वाघिणींचा समावेश आहे

निवासी पशु वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज

सध्या राष्ट्रीय उद्यानात पिंजराबंद प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पूर्ण वेळ निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नाही. वन विभागाअंतर्गत पशुवैद्यकांच्या भरतीचा प्रस्ताव अजूनही रखडलेला आहे. तो तातडीने मजूर होऊन अधिकाऱ्याची नेमणूक करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

Mumbai News: मुंबईतील राणीच्या बागेत गुजरातच्या सिंहाची गर्जना होणार; कधी? महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur cooperative elections : गोकुळ दूध संघासह कोल्हापूर जिल्ह्यातील ५१६ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

SCROLL FOR NEXT