मुंबई

जिथे पोलीस अडवतील, तिथेच बसून आंदोलन सुरू करणार!!

जिथे पोलीस अडवतील, तिथेच बसून आंदोलन सुरू करणार!! स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांचा सरकार, प्रशासनाला इशारा Navi Mumbai Airport Naming Issue BJP MLA Prashant Thakur Attacking Mode Reaction

विराज भागवत

स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांचा सरकार, प्रशासनाला इशारा

बेलापूर: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज (२४ जून) सिडकोला घेराव घालत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबई, पनवेल मुंबई, पुणे, ठाणे, पालघर येथून सुमारे 5 हजारांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्याही दाखल झाल्या आहेत. दंगल नियंत्रण पोलीस पथकदेखील उपस्थित आहे. रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील जवळपास 1 लाखांहून अधिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आजच्या घेराव आंदोलनात सहभागी होणार आहेत. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी दि बा पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आंदोलनाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडत प्रशासनाला इशारा दिला. (Navi Mumbai Airport Naming Issue BJP MLA Prashant Thakur Attacking Mode Reaction)

"लोकनेते दि बा पाटील यांचा आज म्हणजेच २४ जून हा स्मृतिदिन आहे. त्या निमित्ताने सिडकोला घेराब घालण्याचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सिडकोला घेराव घालायचा तर आंदोलकांची कोंडी करण्यासाठी प्रशासनाने कोकण भुवनकडे येणारे बरेचसे रस्तेच बंद करून टाकले आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या मार्गाने लोकं येत आहेत. सगळ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं जायला हवं. आंदोलकांना गावातूनच बाहेर निघून द्यायचं नाही, असा जरी पोलिसांचा प्रयत्न नसला, तरी मार्ग बंद करून सिडकोपर्यंत आंदोलकांनी पोहोचू नये असा प्रयत्न पोलिसांकडून केला गेला आहे. त्यामुळे जिथे पोलीस अडवतील, तिथेच बसून आंदोलन सुरू करणार", असा थेट इशारा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.

राज ठाकरेंच्या भूमिकेवर...

"जेव्हापासून विमानतळाचा प्रस्ताव सुरू करण्यात आला तेव्हापासून म्हणजे २००८पासून विविध नावांचा पर्याय सुचवला जात आहे. राज ठाकरे यांनी जेव्हा छत्रपती शिवरायांचे नाव देण्याबाबतचे मत व्यक्त केले, त्याआधी सिडकोमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. याचाच अर्थ या विमानतळाला दुसरं नाव दिलं जाणार आहे. मग अशा परिस्थितीत दि बा पाटील यांचेच नाव या विमानतळाला दिलं जायला हवं", असा पुनरूच्चार ठाकूर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT