Jyotiraditya Scindia sakal
मुंबई

Jyotiraditya Scindia : नवी मुंबई विमानतळ मार्च 2025 ला होणार सुरु

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुंबई आणि नवी मुंबईचा नसून देशाचा गौरव असलेला एक प्रकल्प असून जवळपास साठ टक्के काम पूर्ण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

खारघर - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुंबई आणि नवी मुंबईचा नसून देशाचा गौरव असलेला एक प्रकल्प असून जवळपास साठ टक्के काम पूर्ण झाले आहे. विमानतळ सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी घेवून मार्च 2025 मध्ये विमानतळ सुरु केले जाईल असे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणी संदर्भात सुरु असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी शनिवार ता. 13 रोजी जोतिरादित्य सिंधिया यांनी नवी विमानतळ प्रकल्पाला भेट देवून पाहणी केली. पाहणी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. विमानतळ सुमारे सोळाशे हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जात आहे.

फेब्रुवारी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ग्रीनफिल्ड प्रकल्पाची पायाभरणी झाली. अठरा हजार करोड रु. खर्च करून उभारल्या जाणाऱ्या विमानतळ विषयी दर महिन्या कामाचा आढावा घेतला जात असे, मात्र आज प्रत्यक्ष पाहणी केली. काम जोरात सुरू असून विमान सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी घेवून दिलेल्या वेळेत या विमानतळ वरून विमान उड्डाण करेल.

विमानतळ या प्रकल्पात चार टर्मिनल असून पहिल्या फेज मध्ये दोन रनवे सुरु केली जाणार आहे. या विमानतळावर वरून दरवर्षी दोन कोटी प्रवासी प्रवास करणार आहे. त्या दृष्टीने हा विमानतळ उभारले जाणार आहे.चारही टर्मिनलचे काम पूर्ण झाल्यावर हॉवर क्राफ्ट, कार्गो आणि वॉटर अश्या प्रकारच्या सुविधा युक्त हे विमानतळ असेल असेही सिंधिया यांनी सांगितले. या वेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक आदी उपस्थित होते.

दहा वर्षात 75 विमानतळ उभे झाले

देशाचा पासष्ट वर्षाच्या काळात राज्यकर्त्यांनी 74 विमानतळ उभारले ,मोदी सरकार आल्यानंतर दहा वर्षात 75 विमानतळ उभारण्यात आले असून येणाऱ्या सहा वर्षात देशात दोनशेहून अधिक विमानतळ उभारण्याचा मोदी सरकारचा संकल्प असल्याचे सिंधिया यांनी काँग्रेसचे नाव न घेता सांगितले. नवी मुंबई विमानतळाचे नाव कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत ठरविले जाईल.

नवी मुंबईत उभारल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिले जाणार आहेत. का असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता,जोतिरादित्य सिंधिया यांनी हा निर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत ठरविले जातील असे सांगून वेळेवर जाहीर केला जाईल असे सांगितले.

देशातील पहिला विमानतळ

नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळ हे रोड, रेल आणि मेट्रोला जोडणारा पहिला विमानतळ आहे. या विमानतळाच्या दहा किलो मीटर परिसरात मेट्रोचे जाळे असेल शिवाय मुंबई पुणे महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा सी लिंकला जोडणारा विमानतळ त्यामुळे हा देशातील सर्वात महत्वाचा विमानतळ आहे. सिडको आणि राज्य सरकारच्या वतीने या कामावर देखरेख केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पटेल, पियूष गोयल यांचं विधान; तटकरे म्हणाले असं काही झालंच नाही

Latest Marathi News Union Budget 2026 Live :अपघात विम्यावर कोणताही टॅक्स नाही ! निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2026 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त अन् काय महाग? वाचा संपूर्ण यादी...

Union Budget 2026 : अर्थमंत्र्यांनी चंदन, नारळ, काजू, शेंगदाणे आणि बदाम याबद्दल काय म्हटले?

Praful Patel NCP president : राष्ट्रवादी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती; पियुष गोयल यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT