मुंबई

Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारा सावत्र पिता अटकेत

Navi Mumbai Police: १३ वर्षीय सावत्र मुलीसोबत अश्‍लील व लैंगिक चाळे करून तिचे लैंगिक शोषण करत होता.

सकाळ वृ्त्तसेवा

Belapur Cirme: बेलापूर भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय व्यक्तीने आपल्या १३ वर्षीय सावत्र मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. एनआरआय पोलिसांनी या सावत्र पित्याच्या विरोधात लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या घटनेतील आरोपी हा तक्रारदार महिलेचा दुसरा पती असून तो तक्रारदार महिला व तिच्या १३ वर्षीय पीडित मुलीसह बेलापूर भागात राहण्यास आहे. तक्रारदार महिला कामावर गेल्यानंतर अथवा रविवारी किंवा सुटीच्या दिवशी आरोपी आपल्या १३ वर्षीय सावत्र मुलीसोबत अश्‍लील व लैंगिक चाळे करून तिचे लैंगिक शोषण करत होता.

या प्रकारानंतर पीडित मुलगी रडल्यास आरोपी तिला मारहाण करण्याची धमकी देत होता. मागील पाच ते सहा महिन्यांपासून सावत्र पित्याकडून पीडित मुलीचे लैंगिक शोषण सुरू होते. अखेर मुलीने आपल्या आईला याबाबतची माहिती दिल्यानंतर तिने एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT