Mumbai Local Crime sakal
मुंबई

Mumbai Local Crime: चेष्टामस्करी करण्याच्या वादातून धावत्या लोकलमध्ये मित्रावर चाकूहल्ला!

कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कल्याण स्थानकातून दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे |After a complaint was lodged at Kalyan Lohmarg police station, the police have detained two accused from Kalyan station.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local Crime: टिटवाळा- वासिंददरम्यान धावत्या लोकलमध्ये एकमेकांची चेष्टामस्करी करण्याच्या वादातून दोघांनी मित्रासह एका सहप्रवाशाला चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

कसाऱ्याहून मुंबईकडे चाललेल्या लोकलने प्रदीप शिरोसे प्रवास करत होते. यावेळी दत्ता भोईर (५५), अमोल परदेशी (४०, रा. शहापूर), तनुज जम्मुवाल (२१, रा. वासिंद) हे तिघेही प्रवास करत होते.

एकमेकांची चेष्टामस्करी सुरू असताना त्यांची प्रदीप शिरोसे यांच्याबरोबर झालेल्या बाचाबाचीतून अमोल याने रागाच्या भरात प्रदीप शिरोसे आणि दत्ता भोईरवर चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कल्याण स्थानकातून दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT