Crime esakal
मुंबई

Navi Mumbai Crime: ईलेक्ट्रीशियनचा मोबाईल नंबर दिला नाही म्हणून तरुणाने काढली चक्क तलवार

Chinmay Jagtap

Navi Mumbai: दूकानातील व्यक्तीने ईलेक्ट्रीशियनचा मोबाईल नंबर न दिल्यामुळे झालेल्या किरकोळ वादात एका तरुणाने चक्क तलवार काढून नाचवल्याचा प्रकार समोर आला आहे.

सिवूड्स सेक्टर ५० येथे सोमवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाविरोधात एनआरआय सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझ सफीक कुरेशी (वय २२) हा तरूण सिवूड्स सेक्टर ५० येथील ओमायरा सोयाटीत दुपारच्या सुमारास एका दूकानात घुसला. या दुकानात बसलेल्या त्याच्या ओळखीच्या तरुणाकडे कुरेशीने ईलेक्ट्रीशीयनचा मोबाईल क्रमांक मागितला.

परंतु वारंवार मागुन सुद्धा मोबाईल क्रमांक न दिल्यामुळे कुरेशीचा संताप अनावर झाला. मोबाईल नंबर देत नसल्यामुळे कुरेशी थेट तलवार काढत दुकानातील मुलाच्या अंगावर धावून गेला.

हा सर्व प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. परंतु या प्रकारामुळे सिवूड्स परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी एनआरआय सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तरुणाला ताब्यात घेतले असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT