Navi Mumbai Crime: sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: सायबर चोरटयानी बँक खात्यातून परस्पर काढली 98 हजाराची रक्कम

वेळीच बँक खाते बंद केल्याने पुढील फसवणूक टळली |Timely closure of the bank account prevented further fraud

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai News: सायबर चोरटयानी इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करुन खारघरमध्ये राहणाऱया एका व्यक्तीच्या बँक खात्यातून 98,500 रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सायबर चोरटयानी आणखी 1 लाख 74 हजारांची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या व्यक्तीने तत्काळ आपले बँक खाते बंद केल्याने सायबर चोरटयाना ती रक्कम काढता आली नाही. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरटयाविरोधात आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार सुमित मुखर्जी (45) हे खारघर सेक्टर-19 मध्ये कुटुंबासह राहण्यास असून गत 21 मे रोजी सायंकाळी अज्ञात सायबर चोरटयानी इलेक्ट्रॉनिक्स साधनांचा वापर करुन त्यांच्या खात्यातील 98,500 रुपये काढले. याबाबतचा ओटीपी त्यांच्या ईमेल आयडीवर आल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला.

त्यानंतर कुणीतरी त्यांच्या बँक खात्यातील रक्कम काढून फसवणुक करत असल्याचे मुखर्जी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ आपल्या बँकेत संपर्क साधुन आपले बँक खाते बंद करण्यास सांगितले.  

काही वेळानंतर मुखर्जी यांना पुन्हा एक मेसेज प्राफ्त झाला, त्यात त्यांच्या खात्यामधुन 1 लाख 74 हजार रुपयांची रक्कम रिलायन्स रिटेल लि.वर गेल्या बाबतचा मेसेज आला. मात्र मुखर्जी यांनी आपले बँक खाते बंद केले असल्यामुळे त्यांच्या खात्यातून सदरची रक्कम गेली नाही.

त्यानंतर मुखर्जी यांनी प्रथम टेली बँकींगकडे तसेच एनआरआय बँकींगमध्ये तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे एनसीआरपी पोर्टलवर सुद्धा फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानंतर 25 मे रोजी त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT