Mumbai Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime: गांजा विक्री करणाऱ्या तीन महिलांसह चारजण अटकेत

Navi Mumbai Crime: या कारवाईत तीन लाख ६३ हजारांचा गांजा जप्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: कोपरखैरणे पोलिसांनी कोपरखैरणेतील बालाजी एक्झॉटिका बिल्डींगसमोरील झोपडपट्टीत कोम्बींग ऑपरेशन दरम्यान गांजा विक्री करणाऱ्या तीन महिलांसह एकाला अटक केली आहे. या कारवाईत तीन लाख ६३ हजारांचा गांजा जप्त केला आहे.

कोपरखैरणे सेक्टर-९ मधील झोपडपट्टीमध्ये मोठ्याप्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अधारे कोपरखैरणे पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करत तब्बल ३ लाख ६३ हजार ६०० रुपये किंमतीचा २० किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

तसेच याप्रकरणी अनिल शिंदे (४५), रादुबाई काळे (४०), सीमा पवार (३३), सुरेखा शिंदे (३०) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांविरोधात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती कोपरखैरणे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT