मुंबई

पेईंगगेस्ट म्हणून आली, आठ लाख घेऊन गेली; ऐरोलीच्या कांबळेंकडे घडला धक्कादायक प्रकार

शरद वागदरे

नवी मुंबई : ऐरोलीतील चिंचपाडा भागात पेईंगगेस्ट म्हणून राहणाऱ्या एका महिलेने मालकाच्या घरातील तब्बल 7 लाख 84 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. सिद्धी वैद्य असे महिलेचे नाव असून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार 47 वर्षीय सुनिता कांबळे या ऐरोलीतील चिंचपाडा भागात कुटुंबासह राहतात. सुनिता यांची मोठी बहिण संगिता सर्वगौडा या कांजुरमार्ग येथे राहतात. त्यांच्या पतीचे नोव्हेंबर महिन्यात आजारपणामुळे निधन झाल्याने सुनिता आणि त्यांचा सांगली येथे राहणारा लहान भाऊ अनिल भाले कांजूरमार्ग येथील बहिणीच्या घरी जात-येत होते. संगिता यांनी आपले दागिने सुनिता यांच्याकडे ऐरोली येथील घरी ठेवण्यासाठी दिले होते. दरम्यान अनिलच्या परिचयातील सिद्धी वैद्य ही महिला सुनिता यांच्याकडे पेंईगगेस्ट म्हणून राहण्यास आली. 

नक्की झालं काय ? 

सुनिता यांचे वडील आजारी असल्याने त्या संगिता आणि अनिल भाले हे सर्व कुटुंबासह सांगली येथे गेले होते. त्यावेळी सिध्दीकडे ऐरोलीतील घराची चावी सुनिता यांनी दिली होती. वडिलांचे निधन झाल्यानंतर धार्मिक विधी पूर्ण करुन सुनिता 2 मार्च रोजी घरी आल्या असता, तब्बल 7 लाख 84 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे तसेच सिद्धी वैद्य देखील फरार असल्याचे आढळले. याप्रकरणी सुनिता कांबळे यांनी रबाळे पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  

navi mumbai crime news guest looted house owner in airoli case registered

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

Pune Civic Row: स-यादीतून बाकडे, पिशव्या खरेदीला मनसेचा कडवा विरोध; महापालिका आयुक्तांकडे निवेदन

SCROLL FOR NEXT