Chain Snatching Crime esakal
मुंबई

Navi Mumbai Crime News : एका तासात दोन महिलांचे १ लाख ३५ हजाराचे दागिने लुबाडले !

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai Crime News : बतावणी करत महिला व ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीतील एकाने एका दिवसात खारघर आणि तळोजा भागातील दोन महिलांजवळचे तब्बल १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही घटना दुपारच्या सुमारास अवघ्या तासाभरात घडल्या असल्याने पोलिसांकडून या भामट्याचा शोध घेण्यात येत आहे.


खारघर सेक्टर- १२ मध्ये राहणाऱ्या अंजली पाटील रविवारी (ता. १०) दुपारी पावणेएकच्या सुमारास आपल्या गणपती विक्रीच्या स्टॉलवर असताना एक भामटा त्यांच्या स्टॉलवर गेला होता. या वेळी त्याने गुप्तदान करण्यासाठी आल्याचे सांगून त्यांच्या दुकानातील लहान गणपती विकत घेण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याने एक फुलांचा हार बाहेर काढून अंजली पाटील यांना पैसे व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन फुलांच्या हाराला लावण्यास सांगितले.

त्यानंतर भामट्याने अंजली पाटील यांची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, पाचशे रुपयांच्या नोटेमध्ये गुंडाळून प्लास्टिक पिशवीत टाकण्याचा बहाणा केला. तसेच हातचलाखी करून घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेनंतर सदर भामटा दुपारी दीडच्या सुमारास तळोजा फेज- १ सेक्टर- १४ भागात चहाच्या टपरीवर गेला होता.

या वेळी भामट्याने चहाची टपरी चालवणाऱ्या मिना मंथराज (६३) यांच्याकडे गणेश मंदिराची विचारणा केली. त्यानंतर त्याने त्याच्याकडे असलेले पैसे त्याला मंदिरातील गरिबांना दान द्यायचे आहेत, असे सांगून आपल्या खिशातून एक हजार रुपये काढले. मिना मंथराज यांना त्यावर मंगळसूत्र काढून ठेवण्यास सांगून ते प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवण्याचा बहाणा करून त्यांचे ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हातचलाखी करून काढून घेतले.

त्यानंतर त्याने तेथून पलायन केले. काही वेळानंतर भामट्याने दागिने लुबाडल्याचे मिना समंथरा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT