Mumbai Crime Sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: पत्नीच्या चेहऱयावर ऍसिड टाकून फरार झालेल्या पतीचा पोलिसांकडून शोध सुरू

Mumbai News| पत्नी हैद्राबाद येथे बहिणीकडे येत नसल्याच्या रागातून पतीन ऍसीड टाकल्याचे उघड |It is revealed that the husband threw acid out of anger that his wife did not come to his sister in Hyderabad

सकाळ वृत्तसेवा

पत्नी, बहिणीकडे राहण्यास येत नसल्याच्या रागातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या चेहऱयावर ऍसीड टाकुन तिचा चेहरा जाळल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल तालुक्यात उघडकीस आला आहे.

रमजान सिद्धिकी गाझी (28) असे या पतीचे नाव असून पनवेल तालुका पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. गत 20 जानेवारी रोजी पहाटे ही घटना घडली असून यात गंभीररित्या भाजलेली विवाहिता सध्या पश्चिम बंगाल येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

या प्रकरणातील जखमी विवाहितेचे नाव अमिना खातुन उर्फ अमिन बिबी रमजान गाझी (28) असे असून ती मुळची पश्चिम बंगाल राज्यातील आहे. सध्या ती पतीसह मोल मजुरी करुन पनवेल तालुक्यातील वावंजे येथील खैरणे गावात रिझवान कंपनीजवळ राहत होती.

अमिना खातुनचा पती रमजान सिद्धिकी गाझी (28) याची बहिण हैद्राबाद येथे राहण्यास असून या बहिणीकडे राहण्यास जाण्यासाठी रमजानने पत्नी अमिना खातुन हिच्या पाठीमागे गेल्या काही दिवसांपासून तगादा लावला होता. मात्र अमिना खातुन हिने हैद्राबाद येथे जाण्यास स्पष्ट नकरा दिला होता. त्यामुळे गत महिन्यामध्ये या दोघा पती पत्नीमध्ये अनेकवेळा भांडण सुद्धा झाले होते. गत 19 जानेवारी रोजी रात्री देखील या पती पत्नीमध्ये याच गोष्टीवर भांडण झाले होते.

त्यामुळे रमजान याने या गोष्टीचा राग मनामध्ये धरुन 20 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास अमिना खातुन हि गाढ झोपेमध्ये असताना तिच्या चेहऱयावर ऍसीडी टाकून पलायन केले. यात अमिना खातुनचा चेहरा गंभीररीत्या भाजल्याने तीने पनवेल मधील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन पश्चिम बंगाल येथील माहेर गाठले.

त्यानंतर अमिना खातुन हिला तिच्या कुटुंबियांनी कोलकाता येथील एन.सी.एम.सी मेडीकल कॉलेज व हॉस्पीटल मध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. त्यानंतर कोलकाता येथील बनियापुकूर पोलिसांनी अमिना खातुन हिचा जबाब नोंदवून झीरो नंबरनुसा गुन्हा दाखल करुन सदरचा गुन्हा पनवेल तालुका पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे.

पनवेल तालुका पोलिसांकडे शनिवारी या प्रकरणाची कागदपत्रे आल्यानंतर पोलिसांनी अमिना खातुन हिच्या चेहऱयावर ऍसीड टाकून फरार झालेल्या पती रमजान सिद्धिकी गाझी याच्या विरोधात कलम 326 (अ) नुसार गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT