thief arrested sakal media
मुंबई

नवी मुंबई : तळोज्यात सात जणांच्या दरोडेखोर टोळीला अटक

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : तळोजा (Taloja) फेज-एकमधील एटीएमवर दरोडा (ATM robbery) टाकण्यासाठी आलेल्या सात जणांच्या टोळीला तळोजा पोलिसांनी अटक (thief arrested) केली. टोळीकडून पोलिसांनी हत्यारे व इतर साहित्य जप्त केले. कारवाईत पकडण्यात आलेल्या टोळीतील सदस्य शुक्रवारी मध्यरात्री तळोजा फेज-एकमधील सोमेश्वर बिल्डिंगजवळ मारुती सुझुकी रिट्झ कारमधून आले होते. या वेळी दरोडेखोर तळोजा भागातील एटीएम तोडून त्यातील रोख रक्कम लुटण्याची तयारी करत होते. याचवेळी तळोजा पोलिस ठाण्यातील (taloja police station) गस्त पथक या ठिकाणी आले असता त्यांना टोळीच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांच्यावर झडप घालून त्यांची धरपकड केली. अंधाराचा फायदा उचलत पळून जाऊ लागल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले.

पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, कोयता, विळा, कटावणी, चाकू, मिरची पूड व इतर साहित्य सापडले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन कारही जप्त केली. त्यांच्यावर दरोडा घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली. मसुब पाशा शेख (३७), आदिल मुस्ताफा अन्सारी (२८), इरसाद मुस्ताफा शेख (२७), अब्दुल नदीम हसमी (२४), नाझीम अस्लम शेख (२६), प्रशांत रामसनई सिंग (२१), अरबान अरझन नईम अन्सारी (२१) या सात जणांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT