Crime sakal media
मुंबई

नवी मुंबई : खारघरमध्ये नेपाळी दाम्‍पत्‍याकडून घरफोडी; गुन्हा दाखल

दोन लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास केल्‍याप्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : खारघर (Kharghar) सेक्टर-२१ मधील बन्सल हाऊस येत कामाला असलेल्या एका नेपाळी सुरक्षारक्षक (Nepali security guard) व त्‍याच्या पत्‍नीने (wife) बन्सल हाऊसमध्ये २ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून (property robbery) पलायन केले. खारघर पोलिसांनी (Kharghar Police) या नेपाळी दाम्पत्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल (police FIR) केला आहे.

कुलविंदरसिंग गुरुदेवसिंग बन्सल हे व्यावसायिक खारघरमध्ये ग्रामविकास भवनजवळच्या बन्सल हाउसमध्ये कुटुंबासह राहतात. त्‍यांनी महिन्याभरापूर्वी बन्सल हाउसच्या देखभालीसाठी पृथ्वी बिनोद चंद या नेपाळी व्यक्तीला त्याच्या पत्नीसह कामाला ठेवले होते. नेपाळी दाम्‍पत्य गेटजवळ असलेल्या वॉचमनच्या केबिनमध्ये राहत होते.

त्यांना किचन नसल्याने ते बन्सल यांच्या घरातील किचनचा वापर करत होते. २५ नोव्हेंबर रोजी रात्री बन्सल यांच्या मित्राच्या मुलीचे लग्न असल्याने ते कुटुंबासह रात्री सव्वा आठच्या सुमारास अंधेरी येथे गेले होते. मात्र सुरक्षारक्षकाला जेवण बनविण्यासाठी किचन लागेल याचा विचार करून त्‍यांनी घराला कुलूप लावले नाही. न करता लग्नासाठी निघून गेले होते.

लग्न समारंभ आटोपून मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास बन्सल कुटुंबीय घरी परतले असता, प्रवेशद्वार खुले होते शिवाय घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले. शिवाय कपाटातील ३ घड्याळे, पेन, सोन्याच्या अंगठ्या व चांदीचा शिक्‍का व रोख रक्कम असा सुमारे २ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे तसेच सुरक्षारक्षक व त्‍याची पत्‍नी गायब असल्‍याचे आढळले. याप्रकरणी बन्सल यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT