police fir
police fir sakal media
मुंबई

वर्गमित्राच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या; दोन जणांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : किरकोळ कारणावरून दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे (Student beating case) भयभीत झालेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (student suicide) उलवे भागात घडली होती. आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्याने त्याबाबतची माहिती ‘इन्स्टाग्राम’वरून त्याच्या मित्राला दिल्याचे पोलीस तपासात (Police investigation) उघड झाले. त्यानंतर न्हावा-शेवा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल (police FIR) केला. क्षितिज असे मृताचे नाव आहे.

क्षितिज उलवे भागात राहत होता. तो सीवूडस येथील एस. एस. महाविद्यालयात बारावीत शिकत होता. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी किरकोळ कारणावरून त्याच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांशी त्याचे भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून क्षितिजला महाविद्यालयाबाहेर अडवून बेदम मारहाण केली. या प्रकाराने हादरलेल्या क्षितिजने वर्गातील विद्यार्थी पुन्हा मारतील, या भीतीने शुक्रवारी (ता. १२) दुपारी उलवे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी त्याचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कुटुंबीयांनी क्षितिजच्या वर्गमित्रांकडे विचारपूस केली. यात क्षितिजला दोन विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात काही मित्रांसमक्ष मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. तसा संदेश क्षितिजने ‘इन्स्टाग्राम’वरून पाठविल्याचे मित्राने सांगितले. त्यानंतर क्षितिजच्या कुटुंबीयांनी न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT