crime  sakal
मुंबई

Crime: घरफोडी करून लाखोंची लुट करणाऱ्या 'त्या' टोळीला पोलिसांनी केली अटक

सकाळ डिजिटल टीम

Crime: वाशी परिसरात घरफोडी करून तब्बल ११ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या कुख्यात शिकलगार टोळीतील एका आरोपीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. ससपाल सिंग ऊर्फ पापा तारासिंग कलानी (वय ३३) असे या आरोपीचे नाव त्याने व त्याच्या इतर तीन साथीदारांनी घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या गुह्यातील सर्व आरोपी शिकलगार टोळीतील सदस्य असून त्यांनी २०१५ मध्ये वाशीमध्ये घरफोडी करताना एका महिलेच्या डोक्यात रॉड घालून तिची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुह्यातील इतर तीन आरोपींचा शोध सुरु केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. शिकलगार टोळीने काही दिवसांपूर्वी वाशीत राहणारे अश्विनी प्रसाद यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरातील सुमारे ११ लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते.

याबाबत वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी या गुह्याचा तपास करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक पवन नांद्रे, सत्यवान बिले यांचे एक पथक तयार केले होते.

पोलिसांच्या पथकाने अत्यंत बारकाईने घटनास्थळावरील तसेच आरोपी पळून गेलेल्या मार्गातील सुमारे ४०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपी राहत असलेल्या परिसराची माहिती मिळवली. आरोपी हे ठाण्यातील शिवाई नगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने वेषांतर करत परिसरात दोन दिवस सापळा रचत आरोपी ससपाल सिंगला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT