Theft esakal
मुंबई

Navi Mumbai Crime: चोराचं धाडस पाहा; चक्क पोलिसाच्याच घरावर मारला डल्ला!

पोलिसांकडुन चोरट्यांचा शोध सुरु ;

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime News| अज्ञात चोरटयानी नवी मुंबई पोलीस दलातील एका महिला पोलिसाचे घर फोडून त्यांच्या घरातील तब्बल सव्वा चार लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात चोरटयाविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार महिला पोलीस नवी मुंबई पोलीस दलात असून त्या उलवे परिसरात कुटुंबासह राहण्यास आहेत. गत 15 जानेवारी रोजी नातेवाईकाचा वाढदिवस असल्याने महिला पोलीस त्यादिवशी दागिने घालुन वाशी येथे कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रमावरुन घरी परतल्यानंतर त्यांनी आपले सर्व दागिने घरातील लोखंडी कपाटात काढून ठेवले होते.

त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी मुलाच्या शाळेत कार्यक्रम असल्याने या महिला पोलिसाने आपल्या घरात कपाटात ठेवलेला सोन्याचा हार व कर्णफुले घालण्यासाठी पाहिले असता, ते त्यांच्या निदर्शनास आले नाहीत. त्यानंतर या महिला पोलिसाने व त्यांच्या पतीने संपुर्ण घरामध्ये दागिन्यांचा शोध घेतला. मात्र त्यांना दागिने सापडले नाहीत. त्यानंतर कुणीतरी चोरटयाने त्यांच्या घरातील सुमारे सव्वा चार लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी गत गुरुवारी एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

SCROLL FOR NEXT