Navi Mumbai Crime sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: अमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक , सहा लाख ५० हजारांचा ऐवज जप्त

Pavel News: ६५ ग्रॅम वजनाचे सहा लाख ५० हजार रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ जप्त |65 grams worth of narcotic drug MD worth Rs 6 lakh 50 thousand seized

सकाळ वृत्तसेवा



Panvel Crime : तळोजा फेज एकमधील पेठाली गाव येथे एमडी हे अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवारी (ता. ७) रात्री सापळा रचून अटक केली. मोबिन मेहबूब खान ( वय २८) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याजवळ असलेल्या ६५ ग्रॅम वजनाचे सहा लाख ५० हजार रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले.


अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज चौधरी व त्यांच्या पथकाने शुक्रवारी सापळा लावला होता. त्यानंतर रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास संबंधित व्यक्ती मोबिन मेहबूब खान हा संशयास्पदरीत्या तिथे फिरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पथकाने त्याची धरपकड केली.

त्याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाच्या पावडरसारखा एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ त्याच्याकडे आढळून आला. याप्रकरणी त्याच्याविरोधात तळोजा पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: मालेवाडी परिसरात पूरस्थिती, सोळा गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT