pmt-bus sakal
मुंबई

Navi Mumbai: ‘एनएमएमटी’ च्या चालक व वाहकाला मारहाण

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai: दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोघा दुचाकीस्वारांनी ‘एनएमएमटी’ बसच्या चालक व वाहकाला मारहाण केल्याची घटना घणसोलीतील टेम्पटेशन चौकात घडली. विक्की अशोक जाधव व निखिल बाळासाहेब धुमाळ अशी आरोपींची नावे असून रबाळे पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या मारहाणीत नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेतील वाहक अमोल जाधव (वय ३४); तर चालक सत्यवान खैरे (वय २९) हे जखमी झाले आहेत. हे दोघे कर्मचारी रविवारी (ता.१) घणसोली ते वाशी रेल्वे स्थानक या ९ नंबरच्या मार्गावरील बसवर कार्यरत होते.

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांची बस घणसोली डी-मार्ट, घरोंदा येथून वाशीच्या दिशेने जात असताना टेम्पटेशन चौकात आली असताना दुचाकीवरून आलेल्या विक्की जाधव व निखिल धुमाळ या दोघांनी बस थांबवत बसमध्ये जात त्यांच्या दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून चालक सत्यवान खैरे याला शिवीगाळ करत बसमधून खाली उतरवले. त्यानंतर त्या दोघांनी बसचालक खैरे व वाहक जाधव यांना ठोशा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT