Navi Mumbai  Sakal
मुंबई

Navi Mumbai : बाधित शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत; आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी याप्रकरणी लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात नुकतीच रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai - कर्जत तालुक्यात सुमारे २६ किलोमीटर लांबीची मिथेन गॅसवाहिनी टाकण्यात आली आहे. ज्‍या शेतकऱ्यांच्या जमिनीतून ही गॅसवाहिनी गेली आहे, त्‍यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. तर काही ठिकाणी जागा एकाच्या नावावर असताना पैसे दुसऱ्यालाच मिळाले आहेत.

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी याप्रकरणी लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात नुकतीच रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी सकारात्‍मक प्रतिसाद देत सामंत यांनी शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे सांगून दोषींवर कारवाई करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

शेतकऱ्यांना न्यायासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली २६ जानेवारी २०२१ रोजी आवसरे येथे रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते.

गुन्हे दाखल करण्याचे आदेश

गॅसवाहिनी बाधित शेतकऱ्यांनी अडचणी मांडल्या असता, संबंधित अधिकाऱ्यांना उदय सामंत यांनी धारेवर धरले.

संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, गॅसवाहिनी टाकताना कंपनीकडून नियमांचे उल्‍लंघन झाल्‍यास चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करावा, असे आदेश उदय सामंत यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT