Metro Sakal Digital
मुंबई

नवी मुंबई मेट्रो मार्च मध्ये धावणार ? नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

सकाळ वृत्तसेवा

खारघर : पेंधर ते खारघर सेंट्रल पार्कदरम्यान (central park) धावणाऱ्या नवी मुंबई मेट्रोची (navi Mumbai metro) चाचणी नुकतीच रेल्वे मंडळाकडून (railway board) पार पडली. पाहणीत रेल्वे मंडळाने काही किरकोळ कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्‍या आहेत. ही कामे पूर्ण झाल्यावरच अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र (Final Protection Certificate) मिळणार आहे. त्यामुळे मार्चमध्‍ये मेट्रो सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त योग वारंवार हुकत असल्‍याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सिडकोने बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम २०११ मध्ये सुरू केले. मात्र त्यात अनेक विघ्ने आल्याने काम रखडले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाची देखभाल व प्रकल्प सुरू करण्यासाठी हे काम महामेट्रोला दिले. वर्षभरात महामेट्रोकडून पेंधर ते खारघर सेंट्रल पार्क या किमान पाच किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये रेल्वेच्या रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) पथकाने चाचणी करून वेग आणि इतर प्रमाणपत्र दिले.

तर ऑसिलेशन चाचणी पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि या सेवेसाठी आवश्यक असलेली मेट्रो रेल्वे सुरक्षा चाचणी जानेवारी महिन्यात पार पडली. या वेळी दोन दिवस सुरक्षा पथकाने पेंधर ते सेंट्रल पार्क, खारघर या पाच किलोमीटर लांबीच्या अंतरावर मेट्रो स्‍टेशन आणि मेट्रोचे डब्बे यांचीही पाहणी करून अहवाल रेल्वे सुरक्षा मंडळाला सादर केला. रेल्वे मंडळाने या सेवेला हिरवा कंदील दाखविल्यानंतर किमान पहिला टप्पा पेंधर ते खारघरदरम्यान २६ जानेवारीपासून नवीन मेट्रो सुरू होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र पेंधर, अमनदूत आणि पेठपाडा या स्थानकात किरकोळ कामे सुरू होती. महामेट्रोला ही कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत.

किरकोळ कामे बाकी

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई मेट्रोचे काम अकरा वर्षांपासून सुरू आहे. महामेट्रोकडे काम सोपवण्यापूर्वी या मार्गावर टाकलेले रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, विद्युत जोडणी करण्यात आली होती. मेट्रो सुरू झाल्यास कोणत्याही प्रकारचे अडथळे येवू नये म्हणून किरकोळ कामे पूर्ण करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाच्या पथकांनी केल्यामुळे मार्च अखेरपर्यंत मेट्रो धावेल का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. रेल्वे मंडळाकडून अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र मार्च महिन्यात प्राप्त होताच मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. मात्र अद्यापही काही कामे सुरू असल्यामुळे सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल की नाही या विषयी सिडकोकडे माहिती नाही.

महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, मार्च महिन्याचे अजून पंधरा दिवस शिल्लक आहे. मार्चमध्ये मेट्रो सुरू न झाल्यास एप्रिल महिन्यात सुरू करावीच लागेल, असे सांगण्यात आले. सिडकोकडून लवकरच मेट्रो सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी वारंवार मुहूर्त पुढे ढकलण्यात येत असल्‍याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सुरक्षा मंडळाकडून नवी मुंबई मेट्रोची पाहणी झाली आहे. मंडळाकडून अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त होताच मेट्रो सुरू केली जाईल.
- प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT