NAVI MUMBAI metro  SAKAL
मुंबई

Navi Mumbai Metro rates: मेट्रो सुरू होऊन ५० दिवस झाले नवी मुंबईकरांचा होतोय द्राविडी प्राणायाम, तिकीट दर होणार कमी?

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई मेट्रो रात्री दहानंतर बंद होतात. तर खारघर रेल्वे स्थानकावर रात्री दहानंतर वेळेवर बस उपलब्ध होत नसल्या

मुळे तळोजावासीयांना खासगी अथवा रिक्षाने प्रवास करताना दुप्पट पैसे मोजावे लागत आहे. सिडको प्रशासनाने नवी मुंबई मेट्रो लोकार्पण सोहळ्यनिमित्त तिकीट दर कमी करून रात्री बारापर्यंत मेट्रोची वेळ वाढवावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

नवी मुंबई मेट्रो सुरु होऊन जवळपास पन्नास दिवस पूर्ण झाले. खारघर आणि तळोजा मधील वाढत्या लोकसंख्येमुळे मेट्रोला अधिक पसंती मिळेल, असे सिडकोला वाटत होते.

मात्र, तिकीट दर जास्त असल्यामुळे मेट्रोने दैनंदिन १२ हजार प्रवासी प्रवास करीत आहे. दरम्यान, मेट्रो सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत सुरु असते. मात्र, रात्री दहानंतर खारघर रेल्वे स्थानकावरून खारघर सेक्टर तीस ते चाळीस आणि तळोजा वसाहतीमध्ये एनएमएमटी बस संख्या अपुरी आणि वेळेवर उपलब्ध होत नाही.

त्यात रात्रीच्या वेळी रिक्षा अथवा खासगी वाहनचालकांना दुप्पट भाडे आकारणी करतात. त्यामुळे घर गाठण्यासाठी तळोजाकरांना द्राविडी प्राणायम करावा लागत आहे.

तिकीट दर कमी होण्याची शक्यता

या विषयी सिडकोच्या मेट्रो विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, मेट्रोचे तिकीट दर जास्त असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. येत्या १७ जानेवारीला मेट्रो सुरु होऊन दोन महिने पूर्ण होत आहे. त्याअनुषंगाने तिकीट दर कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT