मुंबई

Navi Mumbai News : अनधिकृत शाळांना १५ कोटी ५४ लाख रुपयांचा दंड !

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai News: नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील ४ अनधिकृत शाळांना १५ कोटी ५४ लाख १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त दत्तात्रेय घनवट यांनी दिली.

महापालिकेच्या क्षेत्रातील अनधिकृत शाळा बंद होत नसल्यामुळे त्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे आदेश महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांना दिले आहेत. महापालिकेच्या क्षेत्रात वर्ष २००० पासून अद्याप सुमारे ३५ अनधिकृत शाळा होत्या. या अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याच्या वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

या नोटिसांना दाद न दिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये आर्टिस्ट व्हिलेज सी.बी.डी. सेक्टर-८ बी येथील अल मोमिना शाळेला ५ कोटी ५० लाख २० हजार रुपये, नेरूळ सेक्टर-२७ येथील इकरा इंटरनॅशनल स्कूल २ कोटी २४ लाख ७० हजार रुपये, सीवूड सेक्टर-४० येथील द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल १ कोटी १९ लाख ५० हजार रुपये, रबाळे आंबेडकर नगर येथील इलिम इंग्लिश स्कूल ६ कोटी ५९ लाख ७० हजार रुपये दंड लावण्यात आला आहे.

केवळ यातील द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या शाळेने ३ लाख १० हजार रुपये दंड भरला आहे. अन्य कोणत्याही शाळेने महापालिकेच्या नोटिशीला दाद दिली नाही. यादरम्यान वारंवार नोटिसा पाठवल्यामुळे ३५ पैकी काही शाळा बंद झाल्या; तर काही शाळांना शासनाकडून मान्यता मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Peace Deal Update: इराणचा अमेरिकेसोबत शांतता करार, पण इस्रायलची भूमिका काय?; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Omkareshwar Temple: ब्लड डोनेट करा अन् मोफत VIP दर्शन घ्या! ओंकारेश्वर मंदिराची भन्नाट ऑफर; भक्तांची गर्दी, ब्लड बँकही झाली फुल

Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणातून ११६ दिवसांत १०.३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग; १३ जूनपासून कालव्याचा विसर्ग बंद

Latest Marathi News Live Update : भाजप शहराध्यक्षांनी चालवली बस, भितींला धडक

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

SCROLL FOR NEXT