मुंबई

नवी मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, नवी मुंबईत लागणार लॉकडाऊन ?

सुजित गायकवाड

नवी मुंबई, ता. 25 : कोरोनासोबत एक वर्षाच्या प्रदिर्घ लढाईनंतर वाढत्या कोव्हीड रुग्णांमुळे अखेर पुन्हा एकदा नवी मुंबई शहराला कोरोनाने हॉटस्पॉटच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. सद्यस्थित शहरात साडे तिन हजार रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. शहरातीतील एकमेव सिडको प्रदर्शन केंद्रातील जम्बो कोव्हीड केअर सेंटरमधील खाटांची क्षमता संपत आली आहे. त्यामुळे महापालिकेने सानपाडा येथील राधेस्वामी सत्संग सेवाआश्रमातून कोव्हीड केअर केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे. तसेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विभाग अधिकाऱ्यांना कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

मार्च महिन्यात 13 तारखेला नवी मुंबई शहरात पहिला कोव्हीड रुग्ण सापडला. त्यानंतर हळूहळू रुग्णांची गुणाकार स्वरुपात रुग्णवाढ होत गेली. गेल्या वर्षी मार्च 2020 ते मार्च 2021 पर्यंत 60 हजार पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच तब्बल 1100 पेक्षा जास्त लोकांना कोव्हीडमुळे जीव गमवावा लागला आहे. मार्च 2020 पासून शहरात रुग्ण सापडले असले तरी हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले नव्हते. परंतू मे महिन्यानंतर रुग्णवाढीने उच्चांकी पातळी गाठल्यामुळे महापालिकेला 50 पेक्षा जास्त परिसर हॉस्पॉट म्हणून जाहीर करावे लागले. काही ठिकाणी कन्टेन्मेंट झोन जाहीर करून भौगौलिक सीमा बंद कराव्या लागल्या. ही परिस्थिती डिसेंबरनंतर नियंत्रणात आली. शहरातील कन्टेन्मेंट झोन व हॉटस्पॉटची संख्या कमी झाली.

जानेवारी महिना संपल्यानंतर 10 फेब्रुवारीपासून शहरात पुन्हा कोव्हीडचे रुग्ण सापडू लागले. सद्यस्थितीत शहरात साडे तिन हजार पेक्षा जास्त रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. ऐरोली, नेरूळ आणि बेलापूर हे तीन नोड सर्वाधिक कोव्हीडचे रुग्ण असणारे नोड आहेत. या नोडमध्ये सिडको वसाहती या कोव्हीड रुग्णांच्या संक्रमण पसरवणाऱ्या वसाहती ठरल्या आहेत. त्याकरीता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विभाग अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार कन्टेन्मेंट झोन व हॉटस्पॉट जाहीर करण्याच्या आदेश दिले आहे.
 

विभागनिहाय रुग्ण

बेलापूर - 602, नेरूळ - 624, वाशी - 568, तुर्भे - 448, कोपरखैरणे - 604, घणसोली - 398, ऐरोली - 728, दिघा - 106
 

शहरात कोव्हीडचे रुग्ण वाढत आहे. गावठाण व झोपडपट्टी येथे शहरी भागापेक्षा तुलनेत कमी रुग्णसंख्या आढळून आली आहे. मात्र तरी देखील ज्या भागात गरज असेल त्या भागात कन्टेन्मेंट झोन अथवा हॉटस्पॉट जाहीर करण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

वाशीचे जम्बो कोव्हीड केअर केंद्र भरले

नवी मुंबई महापालिकेतर्फे कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात व्यवस्था केली आहे. या ठिकाणी तब्बल 1200 खाटांचे नियोजन केले आहे. त्यापैकी 800 पेक्षा जास्त रुग्ण सद्यस्थितीत उपचार घेत आहेत. या केद्रांवर वाढलेला भार पाहता आयुक्त अभिजीत बांगर यांनी सानपाडा येथील राधेस्वामी सत्संग आश्रमातील साडे सातशे खाटांची क्षमता असणारे कोव्हीड केअर केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

कसे असतील कन्टेन्मेंट झोन

- एका इमारतीमध्ये पाच पेक्षा जास्त रुग्ण असल्यास इमारत सील करणार
- पाच पेक्षा कमी असेल तर फक्त मजला सील करणार
- भौगोलिक परिसर पाहून रुग्णांची संख्या लक्षात घेता परिसरात प्रवेश घेणाऱ्या भौगोलिक सीमा बंद करता येऊ शकतात. 

navi mumbai once again becoming corona hotspot lockdown in navi mumbai is the question

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT