security update on 31st december year  esakal
मुंबई

Navi Mumbai: अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai: नववर्ष स्वागतावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून खारघर डोंगरावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांनी पथक तयार केले असून एक दिवसासाठी ही बंदी असणार आहे.

खारघर आणि ओवे डोंगर हिरवाईने नटलेला आहे. खारघर परिसरातील बहुतांश मित्र मंडळी सुट्टीच्या दिवशी फेरफटका मारण्यासाठी डोंगर गाठतात. त्यात थर्टीफस्टसाठी हॉटेल, फार्महाऊस आदी स्थळ बुक झाल्याने दारूचे आणि खाद्यपदार्थांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे.

त्यामुळे काही मित्र मंडळी छुप्या मार्गाने ओवे डोंगरावर थर्टीफस्ट साजरा करण्याचा बेत आखला जातो. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून खारघर पोलिसांनी डोंगरावर जाण्यास बंदी घातली आहे. तसेच सिडकोच्या सुरक्षारक्षकांसमवेत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

टेकडीवर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांशिवाय इतरांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच गोल्फ कोर्स, सेन्ट्रल पार्क परिसरात गस्तीसाठी पोलिस पथक तैनात असणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा प्रयत्न आहे.

- राजीव शेजवळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खारघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT