Crime News esakal
मुंबई

Navi Mumbai: वृद्ध महिलेचे १ लाखाचे मंगळसुत्र खेचणारा लुटारु अटकेत

चोराला प्रवाशांनी पकडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री सानपाडा रेल्वे स्थानकात घडली | The incident of the thief being caught by the passengers took place at Sanpada railway station on Monday midnight

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crime : महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोराला प्रवाशांनी पकडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री सानपाडा रेल्वे स्थानकात घडली.

सरताज मोहम्मद मनीर शाह (वय २४) असे या चोराचे नाव आहे. त्याला अटक करून मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे.(navi mumbai Crime)

सानपाडा सेक्टर-१६ मध्ये राहणाऱ्या शोभा कोठावदे (वय ६४) या सोमवारी (ता. ११) पती प्रकाश कोठावदे यांच्यासोबत डोंबिवली येथे नातेवाइकांकडे गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर कोठावदे दाम्पत्य मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली येथून लोकलने सानपाडा रेल्वे स्थानकात आले होते. sanpada crime news)

हे दाम्पत्य रेल्वे स्थानकातील पायऱ्या उतरून सबवेमधून बाहेर पडत असताना, त्यांच्या पाठीमागून आलेल्या सरताजने शोभा यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. शोभा यांनी आरडाओरड केल्यानंतर सानपाडा रेल्वे स्थानकात साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी प्रवाशांच्या मदतीने सरताज शाह याला पकडले. (crime news sanpada )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT