School Close esakal
मुंबई

School Closed: सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळं निर्णय

हवामान खात्यानं कोकणसहित मुंबई, ठाणे, नवी मुंबईत इथं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या (9 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्यानं मुंबई आणि उपनगरात पावसाचा रेट अॅलर्ट जाहीर केल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव नवी मुंबई महापालिकेनं उद्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच या आदेशाची काटेकोर अंमलबजावणीचे आदेशही देण्यात आले आहेत. (Sindhudurg, Thane, Navi Mumbai School Closed tomorrow due to heavy rain alert by IMD)

नवी मुंबई महापालिकेनं काढलेल्या परिपत्रकानुसार उद्या महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी असणार आहे. यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी शाळांचा समावेश आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असा आदेशही यातून देण्यात आला आहे.

दरम्यान, ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं उद्याही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. यासाठी काढलेल्या परिपत्रकात म्हटलं की, सध्याच्या स्थितीत जिल्हात सुरु असलेली अतिवृष्टी विचारात घेता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या शक्यतेनुसार पहिली ते १२ पर्तंतच्या सर्व माध्यमांच्या आणि मंडळांच्या शाळांना उद्या ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. शाळेत जाताना आणि येताना विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर उद्या सिंधुदुर्गातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं रेड अलर्ट जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : आझाद मैदानावरील घाणीवरून सकल मराठा महासंघाचा इशारा; कचरा मंत्रालयात टाकू, दूध-भाजीपाला पुरवठा बंद करू!

Aajoba Ganpati: भारतातील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘आजोबा गणपती’, वाचा इतिहास, परंपरा आणि गौरव

एकेकाळी अंकिता लोखंडेलाही प्रियाने दिलेली टक्कर; पवित्र रिश्तामधील गाजलेली भूमिका ते दमदार खलनायिका

MLA Dheeraj Lingade: शेगाव येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे: आमदार धीरज लिंगाडे; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विभाजनाची मागणी

Kolhapur Sound System : ‘काचा फोडण्याची’ भाषा करणारा पळाला, पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षाला बोलवून दिला प्रसाद; साउंड सिस्टीमविरोधात पोलिस आक्रमक

SCROLL FOR NEXT