मुंबई

Navi Mumbai: टाकी साफ करणाऱया कामगाराचा चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

Crime: खांदा कॉलनी सेक्टर-१ भागात टेरेसवरील पाण्याची टाकी साफ करताना इमारतीवरील डक्टच्या छतावरील सिमेंटचा पत्रा फुटल्याने चौथ्या मजल्यावरून खाली पडलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

या घटनेतील मृत कामगाराला कंत्राटदाराने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली साधने न पुरविल्यामुळे ही घटना घडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी या घटनेला जबाबदार कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत मारुती जोमा घुटे (वय २८) हा पनवेल तालुक्यातील धोदाणी येथे कुटुंबासह राहत होता. तो कंत्राटदार नागेश गुप्ताकडे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे साफसफाईचे काम करत होता.

आरोपी गुप्ताने मारुतीला खांदा कॉलनी सेक्टर-१ मधील साई सिमरन सोसायटीतील टेरेसवरील पाण्याची टाकी साफ करण्याच्या कामाला लावले होते. मारुतीने सदर इमारतीवरील पाण्याची एक टाकी साफ केली होती. त्यानंतर तो दुसरी टाकी साफ करण्यासाठी इमारतीवरील डक्टच्या छतावरील सिमेंटच्या पत्र्यावरुन जात होता. मात्र याचवेळी सदरचा पत्रा फुटल्याने मारुती चौथ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला जवळच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्‍याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT