Gangster Chirag Loke Died sakal
मुंबई

Navi Mumbai: नेरुळमधील 'चिराग लोके' हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत

नेरुळ हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai : मानखुर्दच्या कारशेड मधील माथाडी साईट मिळविण्याच्या वादातून चिराग महेश लोके (30) या गुंडाची निर्घृणपणे हत्या करुन फरार झालेल्या हल्लेखोरापैकी आणखी दोन आरोपींना नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे.

त्यामुळे या हत्या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणाचे धागेदोरे हे मुंबईसह इतर भागात पसरल्याने तसेच यात काही संघटीत टोळ्यांचा सहभाग असल्याचा संशय असल्याने या हत्या प्रकरणाचा तपासात आता गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

नेरुळ सेक्टर-20 मध्ये राहणारा चिराग लोके व हत्या करणारा आरोपी अरविंद सोडा या दोघांमध्ये मानखुर्दच्या कारशेड मधील माथाडी साईटचे काम मिळविण्यावरुन मागील काही महिन्यांपासुन वाद सुरु होता.

चिरागने सदरचे काम सोडावे यासाठी त्याला धमकावण्यात देखील आले होते. याच वादातून गत 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अरविंद सोडा व त्याचे साथिदार अरबाज, पगला, शेरा व इतर पाच ते सहा हल्लेखोरांनी चिराग व त्याच्या पत्नीवर लोखंडी रॉड व इतर हत्याराच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला.

यात चिरागचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी आरोपी अरविंद सोडा याच्यासह पाच ते सहा हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रथम मुंब्रा येथून अरबाज जयासुद्दीन शेख (25) याला अटक केली.

त्यानंतर पोलिसांनी सानपाडा येथून दिपक सुरेश खरटमल (28) याला तसेच उमेश जंजाळ उर्फ गावठी (32) या दोघांना अटक केली आहे. यातील अरबाज शेख याला न्यायालयाने 22 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

पुढील तपास गुन्हे शाखेकडे

गवळी गँगशी संबधीत असलेला चिराग लोके व छोटा राजन गँगशी संबधीत असलेला अरविंद सोडा हे दोघेही वेगवेगळ्या गुह्यात एकाच जेलमध्ये असताना, त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून मानखुर्द येथील कारशेडच्या कामात लेबर सफ्लाय व मेटरीयल सफ्लाय करण्यावरुन वाद सुरु होता.

सीवूड्स येथील ग्र्डँ सेंट्रल मॉलमध्ये लेबर सफ्लाय करण्यावरुन देखील त्यांच्यामध्ये वाद सुरु होता. याच वादातून अरविंद सोडा व त्याच्या साथिदारांनी चिराग लोके याची निर्घृणपणे हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या हत्या प्रकरणाचा या हत्या प्रकरणाचे धागेदोरे हे मुंबईसह इतर भागात पसरल्याने तसेच या प्रकरणात काही संघटीत टोळ्यांचा सहभाग असल्याचा संशय असल्याने या हत्या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

तानाजी भगत (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरुळ, पोलीस ठाणे)

चिराग लोके याच्या हत्या प्रकरणात अतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-1 कडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार या हत्या प्रकरणातील आरोपीं गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT