parbhani sakal
मुंबई

Navi Mumbai: बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना झाली अटक

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai: तळोजा येथील पापडीचा पाडा भागात बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई पथकाने अटक केली. यातील दोघे पुरुष काही वर्षांपासून; तर महिला काही महिन्यांपासून या ठिकाणी मजुरी व घरकाम करून बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे चौकशीत आढळून आले.

तळोजा येथील पापडीचा पाडा भागात काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई पथकाला मिळाली होती. पोलिस निरीक्षक प्रतिभा शेडगे यांच्या सुचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक वानखेडे व त्यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. ८) सकाळी ७ वाजता तळोजा येथील पापडीचा पाडा भागातील जय मल्हार बिल्डींगमध्ये छापा टाकला.

या वेळी खोली क्र. २०१ मध्ये आलम गिर गजलु मुल्ला (वय ५३) हा राहत असल्याचे आढळून आले. खोली क्रमांक २०३ मध्ये सागोर बाकी खान (वय २६) व त्याची पत्नी रिया सागोर खान (वय २३) हे दोघे राहत असल्याचे आढळून आले. त्यामुळे दहशतवादविरोधी पथकाने तिघांविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

गरिबीला कंटाळून भारतात घुसखोरी

दशतवाद विरोधी पथकाने तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. आलम गिर गजलु मुल्ला याने २०१३ मध्ये तसेच सागोर उर्फ फिरदोस सिकदर बाकी खान याने २०१५ मध्ये बांगादेशातील गरिबीला कंटाळून घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. रिया उर्फ शिखा सागोर उर्फ फिरदोस सिकदर खान हिने जुलै २०२३ मध्ये उपचारासाठी तिच्या पतीसह घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; चार तरुण गंभीर जखमी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT