Navi Mumbai sakal
मुंबई

Navi Mumbai: ठाणे बेलापूर मार्गावर उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकुन दोन कंटनेर झाले पलटी

Thane Belapur Highway: कंटेनर उलटल्याच्या दोन घटनांमुळे वाहनचालकांना त्रास

सकाळ वृत्तसेवा

Accidnet News: एका कंटेनरने रिलायन्स कंपनीसमोरील उड्डाणपुलाच्या कठड्याला धडक दिल्याने कंटेनर उलटल्याची घटना शनिवारी (ता.६) पहाटे अडीचच्या सुमारास रबाळे येथे घडली. यामध्ये या कंटेनरने पेट घेतल्याने आगीत केबीन जळून खाक झाली. त्यातच काही वेळाने दुसरा एक कंटेनर घणसोली रेल्वेस्थानकासमोरील उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून उलटला. कंटेनर उलटण्याच्या या दोन्ही घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे पहाटेच्या सुमारास ठाणे-बेलापूर मार्गावर दोन्ही वाहिन्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली.

ठाण्याहून बेलापूरच्या दिशेने मालाने भरलेला कंटेनर घेऊन जाणाऱ्या चालकाला रबाळे येथील रिलायन्स कंपनीसमोरील उड्डाणपुलाचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात असलेल्या या कंटेनरने उड्डाणपुलाच्या कठड्याला जोरदाक धडक दिली. या धडकेत कंटेनर उलटल्याने या ट्रेलरच्या केबिनने पेट घेतला. यावेळी चालक व क्लिनर या दोघांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने ते यातून बचावले. या घटनेची माहिती मिळताच रबाळे वाहतूक पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

या प्रकारामुळे बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच पहाटे साडेचारच्या सुमारास बेलापूर येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलर चालकाला घणसोली रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचा अंदाज न आल्याने हा ट्रेलर उड्डाणपुलाला धडकून उलटला. या अपघातातील दोन्ही कंटेनर भररस्त्यात उलटल्याने शनिवारी (ता. ६) ठाणे-बेलापूर मार्गावर दोन्ही वाहिन्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली.

वाहतूक सेवा रस्त्याने वळवली

रबाळे वाहतूक पोलिसांनी ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सेवा रस्त्यावरून वाहतूक वळती केली. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी रबाळे येथील अपघातग्रस्त कंटेनर क्रेनच्या साह्याने बाजूला केला, तर घणसोली रेल्वे स्थानकासमोरील कंटेनर सायंकाळच्या सुमारास बाजूला करत या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या दोन्ही घटनांची नोंद रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली... नवी मुंबईतून समोर आली महत्त्वाची बातमी, जाणून घ्या टॉस कधी

Ganesh Kale Murder: गणेश काळे हत्या प्रकरणात बंडू–कृष्णावर गुन्हा दाखल, आंदेकर गँगचा डाव उघड! पोलिसांनी दिली माहिती

पार्टीला जातोय! रात्री आईला सांगितलं, पहाटे अपघातात चुलत भावांचा मृत्यू; भरधाव वेगात हँडब्रेक ओढला अन् सगळं संपलं

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

Latest Marathi News Update : लक्ष्मण हाके यांचा विखे पाटलांवर हल्लाबोल; “आरक्षणाचा अर्थच कधी समजला नाही!”

SCROLL FOR NEXT