Navi Mumbai sakal
मुंबई

Navi Mumbai: दुर्दैवी घटना, लिफ्टच्या डक्टमध्ये पडून तरुणाचा मृत्यू !

Death In Lift: पोलिसांनी कंत्राटदाराला जबाबदार धरून त्याच्याविरोधात बुधवारी सुरक्षा उपाययोजनांबाबत निष्काळजी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Panvel News: तळोजा घोटकॅम्प येथे राहणाऱ्या प्रवीण दिलीप शिंदे (वय ३६) यांचा त्यांच्या घरालगत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडल्यानंतर हा प्रकार उघड झाला. तळोजा पोलिसांनी कंत्राटदाराला जबाबदार धरून त्याच्याविरोधात बुधवारी सुरक्षा उपाययोजनांबाबत निष्काळजी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

तळोजा घोटकॅम्प येथील प्रवीण हे कोयनावळे गावात राहत होते. १५ जूनला रात्री ९ च्या सुमारास ते आपल्या घरातून बाहेर पडले होते; मात्र त्यांनतर ते घरी परतलेच नाहीत. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. अखेर त्याच्या कुटुंबीयांनी तळोजा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी प्रवीणच्या पत्नीने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत जाऊन शोध घेतला असता या इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये ते मृतावस्थेत सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. ते या इमारतीवर फेरफटका मारण्यासाठी गेले असताना लिफ्टसाठी असलेल्या दरवाजातून ते खाली पडले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक तपासात या इमारतीचे बांधकाम करताना या लिफ्टच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा उपाययोजना केली नसल्याचे आढळून आल्याने कंत्राटदार पंकज पटोलिया याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींचा १ तासाचा कार्यक्रम, रस्ता ७ दिवसांसाठी बंद का? उच्च न्यायालयात याचिका दाखल

Hapus Mango Prices : रत्नागिरी हापूस थेट 1000 रुपये डझन; सोलापूर मार्केट यार्डात आंब्यांचे भाव गगनाला भिडले, कर्नाटकी हापूसचा दर काय?

Latest Marathi News Live Update : शिवसेनेतील फुटीमागे चुकीच्या माहितीचे राजकारण; आमदार माऊली कटके यांचा दावा

Sangli Gool Bazaar: तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती! सांगलीचा गूळ बाजार १२ दिवसांपासून ठप्प, कोट्यवधींची उलाढाल बंद, कर्नाटकातून आवकही थांबली

IND vs AFG 2nd ODI: नितीश कुमार रेड्डीची निवड का केली नाही? BCCI चे चिंता वाढवणारे अपडेट्स; नवा ओपनर दुसऱ्या षटकात OUT

SCROLL FOR NEXT