Uran Murder Case Dawood Sheikh 
मुंबई

Uran Murder Case:अखेर दाऊद शेखला अटक! यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश

Navi mumbai Uran Murder Case Dawood Sheikh arrested: उरण येथे यशश्री शिंदे नावाच्या २२ वर्षीय मुलीची हत्या झाली होती. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- उरण येथे यशश्री शिंदे नावाच्या २२ वर्षीय मुलीची हत्या झाली होती. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे. दाऊद शेखला कर्नाटकमधील गुलबर्गा येथून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रँचने ही कारवाई केली आहे. या हत्या प्रकरणात दाऊद हा मुख्य आरोपी असल्याने त्याचा शोध पोलीस घेत होते. अखेर चार दिवसांनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

उरण येथे रेल्वे स्टेशनजवळ यशश्री शिंदे हिचा मृतदेह झुडपात आढळून आला होता. तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. उरणचे नागरिक यावरून आक्रमक झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. याप्रकरणी जवळपास आठ तपास पथके स्थापन करण्यात आली होती. अखेर दाऊद हा जाळ्यात अडकला आहे

दाऊदला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याने यशश्री शिंदेची इतकी निर्घुन हत्या का केली? असा प्रश्न लोकांना पडला आहे. तपासामध्ये याबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे. यशश्रीचा मृतदेह सापडल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी दाऊद शेखचे नाव घेतले होते. तो गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता असं वडिलांनी सांगितलं होतं. त्यानंतर दाऊदचा शोध सुरु झाला.

दाऊद हा कर्नाटकच्या बेंगळुरुचा असल्याची माहिती मिळाली होती. शिवाय, दाऊद यशश्री शिंदेचा पाठलाग करत असल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला होता. यात यशश्री ज्या रस्त्यावरून जात आहे त्याच रस्त्यावरून दाऊद जात असल्याचं दिसून आलं होतं. सीसीटीव्ही फुटेज दाऊदला शिक्षा देण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. यशश्री शिंदे २५ जुलै रोजी बेपत्ता झाली होती. २७ जुलैला तिचा मृतदेह आढळून आला होता.

यशश्रीच्या हत्येमुळे उरणच्या रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. उरणवासीयांनी निषेध मोर्चा देखील काढला होता. यादिवशी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सर्व राजकीय पक्षांनी देखील याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT