navi mumbai washi crime 
मुंबई

Navi Mumbai: अविवाहित असताना गरोदर असल्याचं लपवलं, तरुणीचा बाथरूममध्येच मृत्यू, बाळ सुखरूप

Single girl Hide pregnancy Dies: जूनमध्ये शाळा सुरू झाल्याने तरुणीची भावंडे आईसोबत श्रीवर्धनला परत गेली होती. त्यानंतर वडिलांसोबतच ही तरुणी जुहूगाव येथे राहत होती.

कार्तिक पुजारी

नवी मुंबई- अविवाहित असताना गरोदर असल्याची बाब लपवणे एका १८ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतले आहे. या तरुणीचा प्रसूतीदरम्यान बाथरूममध्येच मृत्यू झाला असून तिने जन्म दिलेले बाळ सुखरूप आहे. गुरुवारी सायंकाळी वाशीमध्ये हा प्रकार घडला.

मूळची श्रीवर्धनची असलेली तरुणी मेमध्ये वाशीतील जुहूगाव येथे कुटुंबासह राहण्यास आली होती. जूनमध्ये शाळा सुरू झाल्याने तरुणीची भावंडे आईसोबत श्रीवर्धनला परत गेली होती. त्यानंतर वडिलांसोबतच ही तरुणी जुहूगाव येथे राहत होती.

गुरुवारी सकाळी घरामध्ये एकटीच असलेल्या मुलीशी तिच्या वडिलांनी मोबाईलवरून संपर्क साधला होता, मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने शेजाऱ्यांना दरवाजा उघडून पाहण्यास सांगितले होते. यावेळी घरातील बाथरूममध्येच तरुणी बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले.

जुहूगावात राहण्यास आलेल्या मुलीवर तिच्या मूळगावी श्रीवर्धन येथेच कुणीतरी लैंगिक अत्याचार केला असण्याची शक्यता आहे, तसेच मुलगी गरोदर राहिल्याचे कुणालाही समजू नये, यासाठी आई- वडिलांपासून हा हा प्रकार लपवल्याची शक्यता आहे. वाशी पोलिसांनी बलात्कार, तसेच पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र हा गुन्हा श्रीवर्धन येथे घडल्याने हे प्रकरण वर्ग होईल, अशी शक्यता आहे.

जन्म दिलेले नवजात बाळ जिवंत होते. त्यामुळे दोघांनाही वाशीच्या महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले असून नवजात बाळावर सध्या पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT