Navi Mumbai:  sakal
मुंबई

Navi Mumbai: एकनाथ शिंदे आज नवी मुंबईत, कोणावर साधणार निशाणा?

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai: ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात गुरूवारी (ता. ९) रॅली काढण्यात येणार असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच नवी मुंबईत येणार असल्याने ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यात शिवसेनेने बाजी मारली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

त्यानंतर आता पहिल्यांदाच एकनाथ शिंदे नवी मुंबईत येत आहेत. सकाळी सहा वाजता एपीएमसी मार्केटपासून या रॅलीला सुरुवात होणार आहे. सकाळी ९ वाजता प्रचार फेरी तुर्भे येथे येणार आहे. वाशी, सानपाडा, नेरूळ- सेक्टर २, ८, १०, गुडविल चौकाजवळून गावदेवी आणि महानगरप्रमुख अशोक गावडे यांच्या कार्यालयाजवळ रॅली समाप्त होणार आहे.

भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यानिमित्त एकत्र येणार आहेत. नरेश म्हस्के यांच्याविरोधात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे रिंगणात उभे असल्याने महायुतीला जोर लावावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT